महामुंबई
अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काम होणार नाही का? मनसे आमदाराचा संतप्त सवाल

मुंबई आणि ठाण्यानंतर डोंबिवली हे सर्वाधिक नागरिकरण झालेले शहर आहे. या शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मात्र दुसरीकडे रस्ते, प्रदूषण, वाहतूक व्यवस्था अशा समस्यामुळे डोंबिवलीकर नागरिक त्रस्त झालेले आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर टॅग करत प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काहीही होणार नाही का?' असा संतप्त सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली #MIDC पुन्हा पुन्हा प्रदुषणाचा त्रास होत आहे. वारंवार तक्रार करूनही @control_board चे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतल्याशिवाय काहीही होणार नाही का ? @CPCB_OFFICIAL @Subhash_Desai @AUThackeray
- Raju Patil (@rajupatilmanase) November 27, 2020