इंदूर कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा १ डाव १३० धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह कसोटी सामन्यात भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आता बांगलादेश सोबतचा पुढचा आणि शेवटचा सामना २२ डिसेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन येथे होणार आहे. या सामन्यात भारताचे गोलंदाज आणि फलंदाज गोघांची कामगिरी मौल्यवान ठरली आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी सामन्यात एका डाव्याने विजय मिळवणारा हा १०वा सामना ठरला आहे. याअगोदर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने नऊ सामने एका डावाने जिंकून आणले आहेत.
इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला गेला.
दोन्ही डावात मोहम्मद शमीची उल्लेखणीय कामगिरी
या सामन्यात दोन्ही डावांमध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. शमीने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याखालोखाल इशांत शर्माने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात २ तर उमेश यादवने दोन्ही डावात प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

