हिंदू धर्मात श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दर महिन्याला येणारी ही चतुर्थी विशेषतः फलदायी असते, परंतु जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.
आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि कुटुंबातील सदस्यांना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
लाल फुलांची आरास केली,
उकडीच्या मोदकांनी थाळी भरली,
अंगारकीला तुझ्या दारी आलो,
मनातील साऱ्या इच्छा तुझ्यापाशी ठेवतो.
शुभ अंगारकी चतुर्थी !
बाप्पाचा आशीर्वाद आणि चंद्राची शीतलता,
तुमच्या आयुष्यात भरभरून सुख घेऊन येवो!
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !!
अंगारकी चतुर्थीच्या या पावन क्षणी,
बाप्पाचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहो.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !!
तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया…!
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना शुभेच्छा !!
गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !!
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !!
अंगारकी चतुर्थीला हेच मागुया
सुख, शांती, समृद्धी सदैव लाभो..
शुभ अंगारकी संकष्टी चतुर्थी !
सण आनंदाचा, बाप्पाच्या आगमनाचा,
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने,
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !!

