Saturday, 14 Dec, 8.10 pm My महानगर

ताज्या बातम्या
.अन्यथा आम्हाला तोंड लपवावे लागले असते; रणजित सावरकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'रेप इन इंडिया' या वादग्रस्त विधानावर राहुल गांधींनी देशाची माफी मागावी ही भाजपची मागणी राहुल गांधी यांनी फेटाळून लावली. एवढेच नाही तर माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नसल्याचं आणखी एक वादग्रस्त विधान त्यांनी आज रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे आयोजित भारत बचाव रॅली दरम्यान केलं. यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. "ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते." असे म्हणत रणजित सावरकरांनी राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेतला.

काय म्हणाले रणजित सावरकर?

"ही चांगली गोष्ट आहे की, त्यांचे नाव राहुल सावरकर नाही. त्यांचे नाव सावरकर असते, तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते. राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून 'नेहरु' काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत. कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूजींनी व्हॉईसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी "भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती. स्वा. सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नातदेखील विचार केला नसता.

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे; संजय राऊतांचा राहुल गांधींना इशारा

रणजित सावरकर पुढे म्हणाले की, "ही गुलामीची शपथ नेहरूजींनी इतक्या निष्ठेने निभावली की, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावरही ते १९५० पर्यंत किंग जॉर्ज लाच भारताचा सम्राट मानत होते. आणि सर्व महत्वपूर्ण निर्णय घेताना त्यांची अनुमती घेत होते. मार्च १९४८ मध्ये जेव्हा राजाजी यांना गव्हर्नर जनरल बनवले. तेव्हाही किंग जॉर्ज यांची अनुमती घेतली होती. असे लोकच स्वा. सावरकर यांच्यासारख्या देशभक्ताचा अपमान करू शकतात."

स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस राहिली नाही

उल्लेखनीय आहे की, स्वा. सावरकर यांच्या अंत्ययात्रेसाठी सरकारने तोफगाडा देण्यास नकार दिला होता. पण जेव्हा नेहरूजींची प्रिय मित्र, लेडी माउन्टबॅटन यांचा मृत्यू झाला. तेव्हा कोणीही न मागताच भारतीय नौदलाची युद्धनौका 'त्रिशूल' तिथे पाठवली होती. हा देश काय कोणाची जहागीर आहे? आता ही स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्त काँग्रेस राहिली नाही, हा तर एका गुलाम वंशाचा पक्ष झाला आहे, अशी टिका रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर केली आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेसह भाजप आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी त्या वक्तव्यासाठी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी आता भाजप करत आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आम्ही ज्याप्रमाणे आम्ही पंडीत नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका. असे ट्विट करत राहुल गांधींना बजावले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top