Saturday, 14 Sep, 6.19 am My महानगर

होम
Asia Cup : बांगलादेशवर मात करत भारताला जेतेपद!

डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ विकेट्सच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे जेतेपद पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ १०६ धावाच करता आल्या. याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव अवघ्या १०१ धावांवर आटोपला. भारताकडून अथर्व अंकोलेकरने चमकदार कामगिरी करत ८ षटकांमध्ये केवळ २८ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स घेतल्या. आकाश सिंहने ३ बळी मिळवत अथर्वला चांगली साथ दिली.

शमीम हुसेनचे ३ बळी

कोलंबो येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णधार ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या फलंदाजांना कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. भारताचा डाव ३२.४ षटकांत १०६ धावांवर संपुष्टात आला. करण लाल (३७) आणि कर्णधार ध्रुव (३३) या दोघांचा ३० धावांचा टप्पा पार करता आला. बांगलादेशकडून शमीम हुसेनने ८ धावांतच ३ बळी घेतले.

१०१ धावांवर बांगलादेशला रोखले

१०७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची खराब सुरुवात झाली. त्यांची पाचव्या षटकात ४ बाद १६ अशी अवस्था होती. यानंतर कर्णधार अकबर अली (२३) आणि मृत्युंजय चौधरी (२१) यांनी काही काळ चांगली फलंदाजी करत बांगलादेशला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा डाव ३३ षटकांनंतर १०१ धावांवर संपुष्टात आला आणि भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top