Dailyhunt
Astrology : देव, मनुष्य आणि राक्षस, गणानुसार ओळखा तुमची खासियत

Astrology : देव, मनुष्य आणि राक्षस, गणानुसार ओळखा तुमची खासियत

हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला मोठं महत्व आहे. असं म्हणतात की पत्रिकेतले ग्रह तारे हे तुमच्या स्वभावाचं आणि भविष्याचा अंदाज देतात. ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या जन्माच्या नक्षत्रांवर आधारित तीन श्रेणी करण्यात आलेले आहेत.

यात देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण असा श्रेणी आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, गुण वेगळे असतात.

देव गण (Dev Gana)

देव गणातील लोक दयाळू, बुद्धिमान, कोमल हृदयाचे आणि भावनिक असतात. ते कायम इतरांच्या भल्याचा विचार करतात. हे लोक आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात आणि साधे राहणे पसंत करतात. समाजसेवा, अध्यात्म किंवा शिक्षक, डॉक्टर यासारख्या सेवा क्षेत्रात ते अधिक दिसतात. कधी कधी यांचा स्वभाव सौम्य असल्याने स्वतःचा फायदा सोडून इतरांच्या मदतीला धावतात. यामुळे त्यांच्या आयुष्यात फसवणूक होण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती भूत-प्रेतांच्या गोष्टींपासून दूर राहतात.

मनुष्य गण (Manushya Gana)

मनुष्य गण असणाऱ्या व्यक्ती भौतिक इच्छा आणि नैतिक मूल्ये यांचा समतोल साधणाऱ्या असतात. या स्वभावाने कष्टाळू, व्यावहारिक असतात. मनुष्य गण असणाऱ्या व्यक्ती समाजात मान-सन्मान मिळवणाऱ्या असतात. अंधश्रद्धेचा थोडाफार प्रभाव यांच्यावर दिसून येतो. भूत-प्रेताविषयीठिकाणी किंवा अशा वातावरणात राहिल्यास त्यांना मानसिक अस्वस्थता जाणवू लागते.

राक्षस गण (Rakshasa Gana)

राक्षस गणातील व्यक्ती तेजस्वी, आत्मकेंद्री, हट्टी, आणि प्रखर बुद्धीच्या असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण, साहस आणि संघर्ष करण्याची जिद्द असते. मात्र, मनाप्रमाणे न झाल्यास यांच्यातील अहंकार, चिडचिडेपणा वाढू शकतो. नातेसंबंधांना ही मंडळी स्वत:पेक्षा जास्त महत्त्व देतात. या मंडळींना नकारात्मक शक्ती आजूबाजूला असल्यास ती पटकन जाणवते.

टीप - वरील माहिती वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Only Maniniआणि my mahanagar live या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar