मे महिन्याच्या सुट्ट्या संपत आल्या की पालकांना बच्चेकंपनीच्या शाळांची तयारी करावी लागते. कारण जून महिन्यात शाळा सुरु होतात. मग बच्चे कंपनीसाठी नवीन स्कूल बॅग्ज, पुस्तक, वॉटरबॅग्ज, टिफीन, शूज , रेनकोट, छत्री घेण्यासाठी पालकांची बाजारात एकच झुंबड उडते.
बाजारातही मुलांच्या आवडी नुसार या सर्व वस्तू व्हरायटीमध्ये उपलब्ध असतात. यामुळे फक्त आकर्षक दिसतात म्हणून काहीजण या वस्तूंची खरेदी करतात. पण खरं तर कोणतीही वस्तू फक्त सुंदर आकर्षक आहे म्हणून विकत न घेता तीचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करून घ्यावा. त्यासाठी या सर्व वस्तू चोखंदळपणे विकत घ्याव्यात.
स्कूल बॅग्ज
लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुलांसाठी शाळेची बॅग्ज ही महत्वाची असते. कारण यात पुस्तक वह्या ठेवायच्या असतात. यामुळे बॅग घेताना छान रंग डिझाईन बघून घेऊ नये तर ती मुलांना सहज कॅरी करता येईल का ते पाहावे. जसे की काही बॅग्ज आकर्षक असतात. पण त्यांचे वजन असते. अशावेळी त्यात पुस्तक वह्या भरल्यानंतर त्यांचे वजन अजून वाढते. यामुळे एवढी जड बॅग खांद्यावरून लटकवून नेणे मुलांसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे वजनाने हलकी बॅग्ज निवडावी.
स्कूल ट्रॉली बॅग्ज
हल्ली बाजारात वेगवेगळ्या स्टाईल व टाईपच्या स्कूल बॅग्ज बाजारात उपलब्ध आहेत. यात स्कूल ट्रॉली बॅग्ज ही मुलांसाठी सगळ्यात सोयीस्कर बॅग्ज आहे. कारण ही बॅग खांद्यावर लटकवण्याची गरज नसते. ट्रॉली बॅग्ज असल्याने ती कॅरी करण्यासाठी वेगळे हँडल असते.
साईड पॉकेट स्कूल बॅग्ज
काही स्कूल बॅग्जला साईड पॉकेट असतात.अशा बॅग्ज नक्की घ्याव्यात. मुलं यात हाताला पटकन लागतील अशा लहान सहान वस्तू ठेवू शकतात. प्रत्येकवेळी बॅग उघडण्याची गरज नसते.
वॉटरप्रूफ बॅग्ज
पावसाळ्याच्या दिवसात वह्या पुस्तके भिजू नयेत यासाठी स्पेशल वॉटरप्रूफ बॅग घ्याव्यात. तसेच आता बॅग्जचे कव्हरही बाजारात सहज उपलब्ध आहेत. तेही तुम्ही वपरू शकता.
वॉटर बॅग
वॉटर बॅग घेताना ती खूप मोठी घेऊ नये. पाण्याचे वजन असते आधीच वह्या पुस्तकाचे वजनाने मुलांचे खांदे दुखावतात. त्यात वॉटर बॅग मोठी असेल तर त्याचेही वजन मुलांच्या मानेवर येते.
कारण मुलं गळ्यात वॉटर बॅग अडकवतात. शाळांमद्येही वॉटर फिल्डर असतात. त्यामुळे मुलं रिकामी बाटली शाळेत भरू शकतात.
मुलांसाठी रेनकोट घेताना एक साईज मोठाच घ्यावा. शूज,छत्र्या मुलांना कॅरी करण्यास हलके आहेत का ते बघावे.
मुलांसाठी टिफीन घेताना मिडियम साईज घ्यावा. उगाच मोठा टिफिन घेऊ नये. मुलांना मोठा टिफीन हाताळणे कठीण जाते.

