मुंबई : माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेषत: शिवसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर देण्यात आल्याचाही दावा केला जात होता.
त्यामुळे प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार का? शिवसेनेत प्रवेश घेणार का? या दाव्यांवर अखेर बच्चू कडूंनी भूमिका मांडली आहे.
शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी आणि मजुरांसाठी हाती घेणार आहोत. प्रहार सामाजिक संघटना आणि दिव्यांग संघटना काय राहणार आहे. शिवसेना कशी वाढेल, यासाठी अंगातील प्रत्येक थेंब जेवढा पक्षासाठी धावणार आहे, तेवढात शेतकऱ्यांसाठी धावणार आहे, असं बच्चू कडूंनी स्पष्ट केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
बच्चू कडू म्हणाले, "शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी आणि मजुरांसाठी हाती घेणार आहोत. आमचे सगळे मुद्दे शिवेसेनेनं स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे मुद्दे रोजगार हमी योजनेत घ्यावेत. हमीभावात सुधारणा करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणीमधील विधवा बहिणी कोरड्या आहेत. दिव्यागांचे मंत्रालय एकनाथ शिंदेंनी स्थापन केले. पण, त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे."
विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, सस्पेन्स अजूनही कायम
"शिवसेनेची राजकीय ताकद बळकट करण्याचे काम करू. आम्हाला शेतकरी, दिव्यागांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कोणताही समजोता होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्त्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहत असेल तर बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या लढाईत एक इंचही कमी पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि दिव्यांग संघटना काय राहणार आहे. शिवसेना कशी वाढेल, यासाठी अंगातील प्रत्येक थेंब जेवढा पक्षासाठी धावणार आहे, तेवढात शेतकऱ्यांसाठी धावणार आहे," असे बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
"शेतकरी, मजूर आणि दिव्यागांसाठी समजोता होऊ शकत नाही. माझा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला होता. मी बाळासाहेब ठाकरेंना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात पत्र लिहिलं होते, ते अजूनही माझ्याकडे आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, वंचित, दिव्यांग बांधवांसाठी कशापद्धतीने कामी येईल, याचा प्रयत्न करू," असं बच्चू कडूंनी सांगितलं.
"मला मागायची सवय नाही. गुवाहाटीला गेल्यावर मंत्रिपद मागितले असते. बाकीची लोक मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत होती. मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलो. कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणारा मी माणूस आहे. शिवसेनेत जन्म झाला शिवसेनेत शेवट हा आनंद आहे. प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रात सुरू राहिला. ज्यांना राजकीय इच्छा आहे, ते शिवसेनेत येतील," असे बच्चू कडूंनी स्पष्ट केले.
३ परदेशी नागरिक पुण्यात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करत होते, कॅब चालकाने पाहिले अन्…

