Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Balen Shah : नेपाळने भारताची जमीन बळकावली बालेन शाह राजनैतिक चर्चेमधून तोडगा काढणार

Balen Shah : नेपाळने भारताची जमीन बळकावली बालेन शाह राजनैतिक चर्चेमधून तोडगा काढणार

नवी दिल्ली : देशाचे सीमाभागांमधले प्रश्न केव्हाही सुटू शकत नाही असा काहीसा अंदाज कायम रक्षातज्ञांकडून वर्तवला जात असतो. भारत आणि नेपाळची फाळणी 1816 साली, झाली असलीतरी अद्यापही सीमाभागांचा प्रश्न तनावातच आहे.

नेपाळ आणि भारत याअगोदर पासून आयात आणि निर्यात संबंधित एकनिष्ट असलेतरी सुद्धा सीमावादावरून त्यांच्यात नेहमीच खडाजंगी होत असते. अशा स्थितीत आता नेपाळनेभारताच्या हद्दीतील जमिनीवर अतिक्रम करून ती बळकावल्याचे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी मान्य केलं आहे. बालेन शाह यांनी ही कबुली आज नेपाळच्या प्रतिनिधीसभेमध्ये एका खासदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. तसेच भारत आणि नेपाळमधील या वादग्रस्त मुद्द्यावरील तोडगा हा राजनैतिक चर्चेमधून काढला जाईल, असेही बालेन शाह यांनी सांगितले आहे.

भारत नेपाळ सीमावादाबाबत बालेन शाह यांनी चर्चा करण्याची आणि त्याची चौकशी करण्यासाठी कटीबद्धताही दाखवली आहे. चर्चेच्या माध्यमातून सारं काही सुरळीत होईल, असेही बालेन शाह यांनी सांगितले आहे. बालेन शाह यांनी केलेल्या या घुसखोरीबद्दल भारत कशा उत्तर देतोय याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले आहे. देशाच्या सीमावादाचा प्रश्न अगदी तूर्तासपणे अधोरेखित करण्यात आले असलेतरी या अतिक्रमणाचा विरोध भारताकडून करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचप्रमाणे भारत आणि नेपाळमध्ये हजारो वर्षांपासून रोटी-बेटी व्यवहार सुरू आहे. दोन्ही देशांमधील शांततापूर्ण संबंधांमुळे एकमेकांच्या जमिनींकडेही कुणाचं लक्ष गेलं नव्हतं. मात्र काही वर्षांपूर्वी नेपाळमध्ये डाव्या पक्षांचं सरकार आल्यानंतर नेपाळ सरकारने आपल्या देशाचा नकाशा बदलत भारताचा भूभाग आपल्या हद्दीत दाखवला होता. मात्र आता बालेन शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकराने हा विवाद सोडवण्यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. परंतू आपल्या देशाच्या नकाशात बदल केले होते. तेव्हा भारताने काही सूचना जारी केल्या होत्या मात्र. आता या स्थितीत आता भारत कक्षा प्रकारे प्रत्युत्तर देईल याकडे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar