"सध्या टीव्ही आणि वर्तमानपत्रात मोदी है तो मुमकीन है च्या जाहिराती झळकत आहेत. पण या जाहिरातींच्या उलट परिस्थिती देशात असून भाजपा आहे म्हणून संविधानविरोधी कायदे देशात तयार होत आहेत. भाजपा आहे म्हणून विकास दर घटला आहे, कांदा १०० रुपये किलो झाला आहे. भाजपा आहे म्हणून ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी शक्य झाली आहे, भाजपा आहे म्हणून ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य झाले आहे. न्याय मिळणे हा कायद्याच्या राज्यात प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, भाजपा आहे म्हणून आज देशात चारही बाजूला अन्यायाचे वातावरण आहे. गरीबांना अडचणीत आणले जात आहे तर श्रीमंतांचे लाड केले जात आहेत." अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
'माझं नाव राहुल गांधी आहे, सावरकर नाही, मी कदापी माफी मागणार नाही'

