Saturday, 14 Dec, 2.32 pm My महानगर

होम
भाजपा आहे म्हणून. प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

"सध्या टीव्ही आणि वर्तमानपत्रात मोदी है तो मुमकीन है च्या जाहिराती झळकत आहेत. पण या जाहिरातींच्या उलट परिस्थिती देशात असून भाजपा आहे म्हणून संविधानविरोधी कायदे देशात तयार होत आहेत. भाजपा आहे म्हणून विकास दर घटला आहे, कांदा १०० रुपये किलो झाला आहे. भाजपा आहे म्हणून ४५ वर्षात सर्वाधिक बेरोजगारी शक्य झाली आहे, भाजपा आहे म्हणून ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य झाले आहे. न्याय मिळणे हा कायद्याच्या राज्यात प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, भाजपा आहे म्हणून आज देशात चारही बाजूला अन्यायाचे वातावरण आहे. गरीबांना अडचणीत आणले जात आहे तर श्रीमंतांचे लाड केले जात आहेत." अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसकडून सरकारविरोधात भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्या बोलत होत्या.

'माझं नाव राहुल गांधी आहे, सावरकर नाही, मी कदापी माफी मागणार नाही'

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

देशाच्या बिकट परिस्थितीला मोदी सरकारला जबाबदार ठरवताना प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्यावरसुद्धा मोदी सरकारला धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, "आता देशात समानतेचा अधिकार राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वाढता वेग पाहिला असता चीनच्या बरोबरीने भारत पुढे जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण भाजपच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात याला खीळ बसली. रोजगार कमी झाला असून लहान व्यापारीसुद्धा जीएसटीमुळे वैतागले आहेत. महागाई वाढत आहे. असे असून देखील बस स्थानकं, टीव्ही तसेच वर्तमानपत्रात 'मोदी है तो मुमकीन है'च्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top