Tuesday, 22 Oct, 10.27 am My महानगर

होम
भारताचा दक्षिण आफ्रिकेला 'व्हाईट वॉश'

भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही डाव गडगडले असून भारताने या सामन्यात आपला पहिला डाव ९ बाद ४९७ वर घोषित केला. मात्र, याचे उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका ३३५ धावांनी पिछाडीवर होती. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्यांना फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आणि तिसर्‍या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची दुसर्‍या डावात ८ बाद १३२ अशी अवस्था होती. तर २०३ धावांनी दक्षिण आफ्रिका संघ पिछाडीवर होता. त्यामुळे भारताला हा सामना एका डावाने जिंकला असून रांची कसोटीत सामन्यात भारताचा २०२ धावांनी दणदणीत विजय झाला आहे.

भारताला सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी फक्त दोन विकेट्सची गरज होती. भारताचा फिरकीपटू शाहबाझ नदीमने दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना बाद करत भारताला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे भारताचा मालिकेतील हा तिसरा विजय ठरला आहे. तसेच यापूर्वी भारताने दोन्ही सामने जिंकले होते.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top