Tuesday, 15 Jun, 3.10 pm My महानगर

देश-विदेश
Boycott of Chinese Products: ४३ टक्के भारतीय ग्राहकांनी चिनी उत्पादनांकडे फिरवली पाठ!

लडाखच्या गालवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात वर्षभराच्या संघर्षानंतरही त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापार आणि व्यापार क्षेत्रात दिसून येत आहे. ( Boycotts of Chinese Products ) सीमा संघर्षानंतर भारत सरकारने आर्थिक आघाडीवर चीनला पराभूत करण्यासाठी आणि स्वदेशी उत्पादनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहीम सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना Boycott of China या माध्यमातून देशाला आर्थिक आघाडीवर सक्षम करायचे होते, कारण कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या आर्थिक व्यवहार बऱ्याच काळापासून ठप्प होते. नंतर सरकारने टिकटॉकसह १०० चिनी अॅप्सवर बंदी घातली.

गलवान खोऱ्याच्या संघर्षानंतर भारतीयांना प्रचंड राग आला. नोव्हेंबर २०२० च्या सण-उत्सवाच्या काळात इंटरनेट मीडिया लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात ७१ टक्के भारतीयांनी असे सांगितले की, त्यांनी कोणताही चिनी बनावटीचा माल खरेदी केलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट कमी होण्यास सुरूवात झाली असून, अशा परिस्थितीत भारतीय ग्राहकांचा सध्याचा दृष्टीकोन कसा आहे हे जाणून घेण्यासाठी लोकल सर्कल्सने पुन्हा एकदा सर्वेक्षण केले. यात ४३ टक्के लोकांनी म्हटले आहे की, त्यांनी गेल्या एका वर्षात कोणतीही चिनी वस्तू खरेदी केली नाही.

सौ. दैनिक जागरण

असं केलं सर्वेक्षण

लोकल सर्कल्सने हे सर्वेक्षण २८१ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या १८ हजार लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्यात. यामध्ये ३३ टक्के महिला आणि ६७ टक्के पुरुष होते. ४४ टक्के लोक टियर १ मधील, ३१ टक्के लोकं टियर २ मधील आणि २५ टक्के लोकं टियर तीन, चार आणि ग्रामीण भागातील होते.


New Guidelines: सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंबंधित केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top