Thursday, 16 Sep, 3.51 pm My महानगर

होम
चहा दोन वेळा गरम करून पिणे आरोग्यास अपायकारक

दिवसभराच्या धावपळीच्या कामात कोणीतरी मस्तपैकी गरमा-गरम चहा प्यायला दिला तर थकवा कुठल्या कुठे पळून जातो हे कळत सुद्‌धा नाही. जगभरामध्ये असंख्य चहा प्रेमी आहेत ज्यांना दर एक तासाला चहा लागतो. इतकंच नाही तर जागतिक चहा दिवस देखील साजरा केला जातो. चहा प्रेमींसाठी कधीही , कुठेही, कीतीहीवेळा चहा प्यायला दिला तरी त्यांच्यासाठी हा क्षण पर्वणीच ठरतो. मात्र वारंवार चहा पिणे शरिरासाठी किती अपायकाराक आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये. मात्र हे सत्य धुडकावून लावत अनेक लोकं वारंवार चहा पिण्याचा हट्ट कायम ठेवत असतात. आता मात्र चहा पिणेच नाही तर चहा पुन्हा गरम करुन पिणे देखील शरिरासाठी अपयाकारक ठरत असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. यामुळे जर तुम्ही उरलेला चहा पुन्हा एकदा गरम करुन पियत असणार तर ताबडतोब ही सवय बदला अन्यथा तुम्हाला घातक आजाराला सामोरे जावे लागू शकते.

चहा तयार झाल्यानंतर याला 15 ते 20 मिनिटांच्या आतच संपूर्ण चहा पिणे योग्य आहे. चहा जास्त वेळ ठेवून दिल्यास त्यामध्ये कडवटपणा निर्माण होतो. तसेच चहा मध्ये असणारे पोषक तत्वे देखील कमी होऊ लागतात. चहा पुन्हा गरम केल्यास त्याच्यामध्ये असणारे निकोटिन आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. तसेच यामुळे शरिराच्या पाचन क्रियेवर परिणाम होतो. चहा बनवल्या नंतर जरी आपण त्याला झाकून ठेवले तरी त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. यामुळे आपल्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी चहा बनवल्यानंतर लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यामुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता वाढते.


हे हि वाचा - तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरणं प्रकृतीसाठी अपायकारक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top