Friday, 27 Nov, 7.09 pm My महानगर

होम
चमकदार त्वचेसाठी डाएटमध्ये करा या ज्यूसचा समावेश

पौष्टिक पदार्थाचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्याने त्यांचा आपल्या आतंरिक शरीरासोबतच बाह्य शरीरावरही होतो. चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी भाज्या आणि फळांचे ज्युस पिणे कधीही उत्तम. भाज्या आणि फळांच्या सेवनामुळे त्वचेसंबंधीत कोणातेही आजार दूर करण्यासाठी मोठी मदत होते. भाज्या आणि फळांच्या ज्युसचे नियमितपणे सेवन केल्यास त्वचा तजेलदार आणि चमकदार होते. फळे आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि पोषक तत्त्व असतात. भाज्या आणि फळांच्या ज्युसमुळे त्वचेवर घात करणाऱ्या विषारी पदार्थांना बाहेर फेकण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या ज्यूसचा समावेश करायला हवा.

टोमॅटो ज्युस


टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सिडेंट तत्त्व असतात. वाढते वय लपवण्यासाठी टोमॅटोची सर्वात जास्त मदत होते. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यास मदत होते. टोमॅटोमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते. दररोज एक ग्लास टोमॅटोच्या ज्युसचे सेवन केल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

गाजर बीट ज्युस

गाजर आणि बीट आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. बीटामध्ये पोटॅशिअम, फोलिक एसिड, मॅगनिज आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा स्वास्थ व्यवस्थित राहते. त्याचप्रमाणे रक्ताभिसरणाचे कार्यही व्यवस्थित होते. गाजरामध्ये व्हिटामिन ए असते. त्यामुळे पिंपल्स आपला बचाव करते. गाजर आणि बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.

डाळींबाचे ज्युस

डाळींबामध्ये ब्लड प्युरीफाई करण्याची शक्ती असते. त्यामुशे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार होते. त्याचप्रमाणे डाळींबा अँटी एजिंग गुण असतात. त्यामुळे त्वचा नवीन आणि तरूण दिसते. डाळींबाच्या ज्युसचे नियमित सेवन केल्याने त्वचा तजेलदार दिसते.

पालक ज्युस

पालक हा खाताना जरी स्वादिष्ट लागत नसला तरी पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये आयर्न आणि व्हिटामिन हे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे व्हिटामिन सी,इ आणि मॅगनीज सारखे पोषक तत्त्वे असतात. पालक ज्युसचे नियमित सेवन केल्यास त्वचेला खूप फायदा होतो.

पपई ज्युस

पपईचे सेवन केल्याने शरीरातील अशुद्ध घटक नष्ट करण्यासाठी मदत करतात. पपईच्या ज्युसचे सेवन केल्याने त्वचा क्लिन आणि चमकदार होते. चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी नियतपणे पपई ज्युसचे सेवन करा.

एलोवेरा ज्युस

कोरफडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वे आहेत. त्वचेची सुंदरता वाढविण्यासाठी बऱ्याचदा कोरफडचा वापर केला जातो. कोरफड हे खनिज आणि व्हिटामीन्सने परिपूर्ण आहे. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. कोरफडमध्ये ऑक्सिन नावाचे हार्मोन असते जे आपल्या त्वचेला उजळ बनवते. त्यामुळे कोरफडीच्या ज्युसचे नियमित सेवन करा त्यामुळे त्वचेला खूप फायदा होईल.


- नकली ब्युटी प्रोडक्ट कसे ओळखाल?

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top