Tuesday, 04 May, 7.59 pm My महानगर

ताज्या बातम्या
Corona New Strain: आंध्रप्रदेशमध्ये कोरोनाचा १५ पट अधिक धोकादायक स्ट्रेन सापडला

देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण आज एकाबाजूला देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे यला मिळाले. तर दुसऱ्याबाजूला देशात कोरोनाचा नवा धोकादायक स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला असून सध्याच्या स्ट्रेनपेक्षा हा नवा स्ट्रेन १५ पट जास्त धोकादायक आहे.

आंध्र प्रदेशातील हा नवा स्ट्रेन देशातील काही भागात थैमान सुरू झाले असल्याचा शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. 'N440K' असे या नव्या स्ट्रेनचे नाव आहे. या नव्या स्ट्रेनमुळेच देशातील काही भागात दुसऱ्या लाटेचा वेग नियंत्रित झाला नसल्याचे संशोधकांना दिसून आले आहे.

महाराष्ट्रातही हा नवा स्ट्रेन आढळला?

'N440K' हा नवा स्ट्रेन पहिल्यांदाच आंध्र प्रदेश आढळला आहे. हा नवा स्ट्रेन आंध्र प्रदेश, तेलंगणासह अनेक देशातील काही भागात वेगाने पसरत आहे. दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये नवीन कोरोनाबाधितांपैकी एक तृतीयांश रुणांमध्ये हा नवा स्ट्रेन आढळला आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही कोरोना धोकादायक नवा स्ट्रेन आढळल्याचा दावा संशोधकाकडून करण्यात आला आहे.

याबाबत राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, 'ही जी काही बाबत निर्दशनास येत आहे, याचा अर्थ अतिशय गंभीरपणे याकडे वे लागणार आहे. आंध्र प्रदेश सरकार आणि आयसीएमआर सारख्या संस्थेकडून हा नवा स्ट्रेन नेमका आढळला की नाही? याबाबत शिक्कामोर्तब होणे फार गरजेचे आहे. जर खरोखरच हा नवा स्ट्रेन सध्याच्या स्ट्रेनपेक्षा १५ पट धोकादायक आहे, तर हे खूप गंभीर आहे. हा नवा स्ट्रेन आंध्र प्रदेशमधून बाहेर येणार नाही, यासाठी पूर्णपणे काळजी घ्यावी लागेल. तिथे कडक लॉकडाऊन करावा लागेल.'


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top