Monday, 23 Sep, 2.40 am My महानगर

क्रीडा
द.आफ्रिकेने भारताला रोखले

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे तिसर्‍या टी-२० सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ विकेट गमावत १३४ धावाच करता आल्या. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर दुसर्‍या सामन्यात भारताने बाजी मारली होती.

तिसर्‍या टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला ९ धावांवर डावखुरा वेगवान गोलंदाज ब्यूरन हेन्ड्रिक्सने माघारी पाठवले. यानंतर शिखर धवन आणि कोहलीने दुसर्‍या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. शिखरने खासकरून फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली. मात्र, चायनामन फिरकीपटू तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या.

पुढच्याच षटकात कोहलीला ९ धावांवर कागिसो रबाडाने माघारी पाठवले. यानंतर रिषभ पंत (१९), हार्दिक पांड्या (१४) आणि रविंद्र जाडेजा (१९) यांच्याव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे भारताने २० षटकांत ९ बाद १३४ अशी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक ३, तर डावखुरा फिरकीपटू बोर्न फॉर्च्युन आणि हेन्ड्रिक्सने २-२ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक -

भारत : २० षटकांत ९ बाद १३४ (शिखर धवन ३६, रिषभ पंत १९, रविंद्र जाडेजा १९; कागिसो रबाडा ३/३९, ब्यूरन हेन्ड्रिक्स २/१४) वि. दक्षिण आफ्रिका.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top