Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Deool Band 2: 'देऊळ बंद २'ची ब्लॉकबस्टर सुरुवात

Deool Band 2: 'देऊळ बंद २'ची ब्लॉकबस्टर सुरुवात

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'देऊळ बंद' या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

तब्बल ११ वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची' या बहुचर्चित सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे. (deool band 2 blockbuster marathi movie housefull response)

शुक्रवारऐवजी गुरुवारी सकाळी सहा वाजता, ब्रह्ममुहूर्त साधत चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, पहाटेच्या शोसाठीही प्रेक्षकांनी थिएटरमध्ये अक्षरशः गर्दी केली.राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत आहे.

'देऊळ बंद २'ची जोरदार चर्चा
मुंबईतील भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ परिसरातही 'देऊळ बंद २'ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली. या भागातील अनेक थिएटरचे सर्व शो हाऊसफुल्ल झाले असून, तिकीट खिडक्यांवर गर्दी झाली आहे. 'बुक माय शो' या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवरही तिकिटांसाठी मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावरही 'देऊळ बंद २'ची जोरदार चर्चा रंगली असून, प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे.

विक्रमी प्रतिसाद
पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील ५०० सिनेमागृहांमध्ये चित्रपटाचे २ हजारांहून अधिक शो प्रदर्शित झाले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये 'देऊळ बंद २'चे तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाले आहेत. एका मराठी चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद विक्रमी मानला जात असून, चित्रपटाच्या लोकप्रियतेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar