Tuesday, 04 May, 10.27 pm My महानगर

ताज्या बातम्या
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे महिन्याभरात कोरोना लसीकरण, कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश

एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे महिन्याभरात लसीकरण करणार असल्याची माहिती कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. आम्हाला प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्या यावे अन्यथा संप पुकारला जाईल असे एअर इंडियाच्या एयरबस वैमानिकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला सांगितले होते. वैमानिकांच्या यूनियन इंडियन कॉमर्शियल पायलट्स एसोससिएशनने कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिला होता की, एअर इंडियाकडून सर्व कर्मचाऱ्यांना वॅक्सीनेशन कॅम्प लावून लसीकरण करण्यात यावे जर कोरोना लसीकरण करण्यात आले नाही तर सर्व कर्मचारी काम बंद करतील. असे पत्रही कंपनीच्या संचालकांना पाठवण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या संचालकांना पत्र लिहिले होते. यामध्ये म्हटले होते की, व्यवस्थापनाकडून त्यांना फ्रंटलाईन कामगार समजूनही लस दिली जात नाही. पायल असोसिएशनने म्हटले आहे की, मोठ्या संख्येने क्रू सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत आणि ते ऑक्सीजन सिलिंडरसाठी तळमळत आहेत. कोरोना साथीच्या काळात लसीशिवाय आपला जीव धोक्यात घालत आहेत. डेस्कवर काम करणाऱ्या आणि बाहेर फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. परंतु क्रू मेंबर अजूनही बाकी आहेत. त्यांना कोरोनाचा धोका अधिक आहे. व्यवस्थापनाने परिस्थिती गंभीर असतानाही पायलटांना काम करण्यास लावले आहे. आम्हाला आशा आहे की, एअर इंडियाच्या सर्व क्रू मेंबर आणि त्यांच्या परिवाराला कोरोना लसीकरण करण्यात येईल असेही या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटात असे कर्मचाऱ्यांना एकाकी सोडणे योग्य नाही आहे. कोरोना काळात वंदे भारत मिशन अंतर्गत अनेक क्रू आणि पायलट कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात यावे अशी मागणी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे कर्मचाऱ्यांनी केली आहे. यानंतर आता सर्व कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना लसीकरण महिन्याभरात करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top