अनेकदा मुलं शाळेतून आल्यावर भूक लागली असा आरडाओरडा करतात किंवा आपणही कामावरून घरी गेल्यावर संध्याकाळच्या सुमाराम आपल्याला भूक लागते. कधी अचानक दारावरची बेल वाजते आणि पाहूणे दारासमोर उभे असतात.
अशावेळी झटपट काय बनवणार? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. तुमची हीच चिंता आज आम्ही मिटवणार आहोत. आजच्या लेखात संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी झटपट होणारे पण पण हेल्दी पदार्थ आम्ही सांगणार आहोत.
मसालेदार मखाना
मखाना प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहेत. तुम्ही हलक्या भूकेसाठी मखाना बनवू शकता. मखाना चाट बनवण्यासाठी मखाना भाजून त्यात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, लिंबाचा रस, चाट मसाला घाला. हा हलका पदार्थ छोट्या भुकेसाठी उत्तम पदार्थ आहे.
स्वीट कॉर्न चाट
स्वीट कॉर्न चाटमध्ये उकडलेले स्वीट कॉर्न, काकडी, टोमॅटो, हिरवी मिरची, चाट मसाला वापरून एक चविष्ट चाट बनवता येईल. या चाटमुळे पोटही भरेल आणि शरीराला पोषणही मिळेल.
पनीर टिक्का
पनीर टिक्का बनवण्यासाठी पनीरच्या तुकड्यांना मसाल्यात मॅरिनेट करून तेल किंवा तूपात भाजावेत. हा एक चविष्ट, हलका आणि हेल्दी स्नॅक्सचा प्रकार आहे.
स्प्राऊट भेळ
विविध कडधान्यांची भेळ लहान मुलांच्या छोट्या भूकेसाठी सर्वात बेस्ट आहे. हा नाश्ता पौष्टिकतेचा खजिना आहे.
भाजलेले चणे
भाजलेले चणे हा झटपट होणारा पदार्थ आहे. यात लोह, फायबरचे प्रमाण अधिक असते.
फ्रेंच फ्राईज
घरच्या तेलात तळलेले फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाहीत. त्यामुळे पाहूण्यांसाठी हा उत्तम नाश्ता आहे. तुम्ही यात मीठ किंवा चाट मसाला वापरून चटपटीत फ्रेंच फ्राईज बनवू शकता.
बटाटा वडा
बटाटा वडा चविष्ट आणि पोटभरणारा नाश्ता आहे. यामध्ये उकडलेल्या बटाट्याची भाजीचे वडे बनवून बेसनात कोट केले जातात आणि तळले जातात.
वेजिटेबल सँडविच
जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही वेजिटेबल सँडविच बनवू शकता. हलका असणारा पदार्थ विविध भाज्यांमुळे पौष्टिक बनतो.

