Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Fifa 2026 : फुटबाॅल विश्वचषकात घडली धक्कादायक घटना.दोन संघ भिडले

Fifa 2026 : फुटबाॅल विश्वचषकात घडली धक्कादायक घटना.दोन संघ भिडले

टावा : शुक्रवारी झालेल्या ग्रुप बी च्या सामन्यात कॅनडा आणि कतार हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कॅनडाचे एकतर्फी वर्चस्व पाहायला मिळाले हा सामना कॅनडाने ६-० ने आपल्या नावावर केला.परंतु,या सामन्यात कॅनडाचा मिडफिल्डर इस्माईल कोने याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे कॅनडाला नुकसानाला देखील सामोरे जावे लागले आहे.कोनेच्या दुखापतीनंतर दोन्ही संघांमध्ये राडा पहायला मिळाला.

सामन्याच्या 54व्या मिनिटाला कतारचा खेळाडू असिम मडिबो याने केलेल्या टॅकलमध्ये कोनेच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाली. सुरुवातीला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले होते, मात्र तपासणीनंतर ते लाल कार्डमध्ये बदलण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय अहवालांनुसार कोनेचा पाय फ्रॅक्चर (हाड मोडणे) झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. कॅनडाचे प्रशिक्षक मार्श्च यांनी सामन्यानंतर सांगितले की दुखापत अत्यंत गंभीर असून कोनेवर शस्त्रक्रिया (सर्जरी) करावी लागणार आहे.

दरम्यान कॅनडाला विजय मिळवून देण्यात जोनाथन डेव्हिडने मोलाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. हा सामना एकतर्फी होता, पण या सामन्यादरम्यान कॅनडा संघाला मोठा धक्का बसला. सामन्यादरम्यान संघातील प्रमुख खेळाडू इस्माईल कोने दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. या सामन्यादरम्यान, कतारच्या २ खेळाडूंना रेड कार्ड देण्यात आले. त्यामुळे कतारला ९ खेळाडूंसह सामना खेळावा लागला. त्यामुळे कॅनडाचा दबदबा आणखी वाढला. कॅनडाने या सामन्यात एकूण ६ गोल केले.

कॅनडासाठी सायल लॅरिनने 16व्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. त्यानंतर जोनाथन डेव्हिडने 29व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत (45+3) डेव्हिडने दुसरा गोल झळकावत कॅनडाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. कतारच्या अडचणी वाढल्या जेव्हा होमाम एल-अमिनला लाल कार्ड दाखवण्यात आले. दुसर्‍या सत्रात नॅथन सॅलिबाने 64व्या मिनिटाला शानदार गोल करत आघाडी 4-0 अशी केली. 75व्या मिनिटाला कतारचा मोहम्मद मनाई याच्या आत्मघातकी गोलमुळे कॅनडाच्या खात्यात पाचवा गोल जमा झाला. सामन्याच्या अखेरच्या क्षणी (90+2) जोनाथन डेव्हिडने आणखी एक गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि कॅनडाचा 6-0 असा दणदणीत विजय निश्चित केला. या विजयामुळे कॅनडा ग्रुप बीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला असून बाद फेरी गाठण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

इस्माईलच्या दुखापतीवरून जोरदार वाद

मॅच संपल्याची शिट्टी वाजताच कॅनडाचे मुख्य कोच जेसी मार्श हे कतारचे मॅनेजर जूलन लोपेटेगुई यांच्याशी हँडशेक करण्यासाठी गेले. परंतु, त्याच वेळी दोन्ही कोचमध्ये इस्माईल दुखापतीवरून जोरदार वाद सुरू झाला. कॅनडाच्या कोचचे हे वर्तन कतारच्या खेळाडूंना आवडलं नाही आणि पाहता पाहता दोन्ही बाजूचे खेळाडू आणि स्टाफ एकमेकांना भिडले, ज्यामुळे सेक्युरिटी गार्डला मैदानात धाव घ्यावी लागली. त्यावेळी मैदानात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं.

स्वित्झर्लंडकडून बोस्निया-हर्झेगोविनाचा 4-1 असा दणदणीत पराभव

फिफा विश्वचषक 2026 च्या ग्रुप-ब मधील सामन्यात स्वित्झर्लंडने बोस्निया-हर्झेगोविनाचा 4-1 असा दणदणीत पराभव करत बाद फेरीकडे मोठे पाऊल टाकले. लॉस एंजेलिस येथे झालेल्या या सामन्यात तब्बल 70 मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र अखेरच्या 20 मिनिटांत सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. स्वित्झर्लंडसाठी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जोहान मन्झांबीने 74व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बोस्नियाचा बचावपटू तारिक मुहरेमोव्हिच याला 80व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले आणि संघ दहा खेळाडूंवर आला. या संधीचा स्वित्झर्लंडने पुरेपूर फायदा घेतला. रुबेन वर्गासने 84व्या मिनिटाला दुसरा गोल केला, तर मन्झांबीने 90व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला.बोस्नियाने हार मानली नाही. एर्मिन माहमिकने अतिरिक्त वेळेत (90+3) शानदार गोल करत फरक 3-1 असा कमी केला. मात्र लगेचच स्वित्झर्लंडचा कर्णधार ग्रॅनिट झाका याने 90+7 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून 4-1 असा अंतिम निकाल निश्चित केला.

मेक्सिकोकडून दक्षिण कोरियाचा पराभव

फिफा विश्वचषक 2026 मधील ग्रुप-अ मधील महत्त्वाच्या सामन्यात यजमान मेक्सिकोने दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करत बाद फेरीतील (राऊंड ऑफ 32) प्रवेश निश्चित केला. या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच सावध खेळ केला. पहिल्या सत्रात अनेक आक्रमणे झाली, मात्र कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आले नाही.
दुसर्‍या सत्राच्या 50व्या मिनिटाला सामन्याचा निर्णायक क्षण आला. दक्षिण कोरियाचा गोलरक्षक किम स्युंग-ग्यू याच्या चुकीचा फायदा घेत मेक्सिकोच्या लुईस रोमो याने चेंडू जाळ्यात धाडला आणि मेक्सिकोला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा सामन्यातील एकमेव गोल ठरला. या विजयामुळे मेक्सिकोचे दोन सामन्यांत सहा गुण झाले असून त्यांनी ग्रुप-अमध्ये अव्वल स्थान निश्चित केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar