नवी दिल्ली : फिफा वर्ल्ड कपमध्ये बुधवारी जे आणि'आय' ग्रुपचे दोन सामने खेळले गेले. आय ग्रुपमधील पहिल्या सामन्यात फ्रान्सने आपल्या सलामीच्या सामन्यात सेनेगलला 3-1 ने हरवले.
न्यू जर्सीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात स्टार फॉरवर्ड किलियन एम्बापेने दोन गोल केले आणि फ्रान्सच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. त्याने माजी स्ट्रायकर ऑलिव्हियर गिरूडचा विक्रम मोडला. फ्रान्ससाठी ब्रॅडली बारकोलानेही एक गोल केला, तर सेनेगलचा एकमेव गोल इब्राहिम म्बाएने केला.पहिल्या हाफमध्ये एकही गोल नाही, दुसर्यामध्ये 4 गोल सामन्याचा पहिला हाफ गोलरहित राहिला, पण दुसर्या हाफमध्ये एम्बापेने फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बारकोलाने स्कोअर 2-0 केला. सेनेगलच्या 18 वर्षीय इब्राहिम म्बाएने गोल करून फरक कमी केला आणि वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा सर्वात तरुण आफ्रिकन खेळाडू ठरला.
नॉर्वेकडून इराकचा 4-1 ने पराभव
त्याचबरोबर,आय ग्रुपमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात नॉर्वेने इराकचा 4-1 ने पराभव केला. स्ट्रायकर एर्लिंग हालँडच्या शानदार दोन गोलमुळे नॉर्वेने आपल्या फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात इराकचा 4-1 ने पराभव केला आहे. नॉर्वेचा संघ तब्बल 28 वर्षांनंतर या स्पर्धेत खेळत आहे. सामन्यात हालँडच्या दोन गोलव्यतिरिक्त लिओ ओस्टिगार्डने एक गोल केला, तर इराकच्या आयमेन हुसैनच्या आत्मघाती (ओन) गोलमुळे नॉर्वेचा मोठा विजय निश्चित झाला.पहिल्या हाफमध्ये इराकने कडवी झुंज दिली, हालँडच्या दोन गोलमुळे आघाडी मिळाली सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळाली. स्टार फॉरवर्ड एर्लिंग हॉलंडने गोल करून नॉर्वेला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली, पण इराकच्या आयमेन हुसेनने लवकरच गोल डागून स्कोअर 1-1 ने बरोबरीत आणला. मात्र, हॉलंडने हाफ-टाइमच्या अगदी आधी आपला दुसरा गोल डागून नॉर्वेला सामन्यात पुन्हा आघाडीवर आणले. यानंतर दुसर्या हाफमध्ये लिओ ओस्टिगार्डने संघासाठी तिसरा गोल केला. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये इराकच्या आयमेन हुसेनकडून एक चूक झाली आणि त्याच्याकडून झालेल्या ओन गोलने नॉर्वेला 4-1 असा एकतर्फी विजय मिळवून दिला.
मेस्सीची हॅट्ट्रिक
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मेस्सीने ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. लियोनल मेस्सीने पहिल्याच सामन्याच अल्जीरियाविरुद्ध खेळताना गोल मारत हॅट्ट्रीक नोंदवली आणि जे ग्रुपमध्ये अर्जेंटिनाने अल्जीरियावर 3-0 असा विजय मिळवला. या तीन गोलसह मेस्सीने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोलची बरोबरी साधली आहे. मेस्सीने हा विक्रम अर्जेंटिनासाठी 200 सामना खेळता नोंदवला आहे.वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात मेस्सीने गोलची हॅटट्रीक पहिल्यांदाच मारली आहे. तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 11व्यांदा त्याने ही कामगिरी केली आहे. या हॅट्ट्रीकसह त्याने फिफा वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल मारणार्या जर्मनीच्या मिरास्लोव क्लोजशी बरोबरी केली आहे. त्याने 16 गोल मारत विक्रम रचला होता. आता मेस्सीने त्याच्या 16 गोलशी बरोबरी केली असून त्याच्या पुढे जाण्याची संधी आहे.
ऑस्ट्रियाचा जॉर्डनवर 3-1 असा विजय
फिफा विश्वचषक 2026 च्या ग्रुप जे मधील सामन्यात ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणार्या ऑस्ट्रियासाठी हा महत्त्वाचा विजय ठरला.
सामन्याच्या 2१व्या मिनिटाला रोमानो श्मिडने शानदार लांब पल्ल्याचा फटका मारत ऑस्ट्रियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र जॉर्डनने हार मानली नाही. दुसर्या हाफच्या सुरुवातीलाच, 50व्या मिनिटाला अली ओलवानने अप्रतिम गोल करत जॉर्डनला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. हा जॉर्डनच्या विश्वचषक इतिहासातील पहिलाच गोल ठरला.सामना बरोबरीत जात असल्याचे दिसत असताना 77व्या मिनिटाला जॉर्डनचा बचावपटू याझान अल-अरब याच्याकडून स्वयंगोल झाला आणि ऑस्ट्रियाने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर जॉर्डनने जोरदार प्रयत्न केले, पण ऑस्ट्रियाचा बचाव भक्कम राहिला. अखेर दुखापत वेळेत (90+12) मार्को अर्नाऊटोव्हिचने पेनल्टीवर गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

