Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गॅस सिलिंडरच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीविरोधात ठाकरे गट रस्त्यावर

गॅस सिलिंडरच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीविरोधात ठाकरे गट रस्त्यावर

मुंबई : आखाती देशातील युद्धामुळे राज्यासह देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. अशातच महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत महागाईच्या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याचेच पाहायला मिळत आहे.

कारण, 30 मे रोजी मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आणि गेल्या 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा सीएनच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आज (02 जून) शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात आज मुंबईत आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीविरोधात ठाकरे गटाकडून गिरगाव परिसरात निदर्शने करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सायकल चालवली. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेवर महागाईचे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात दक्षिण मुंबईतील विभाग क्र. 11 मध्ये इंधन दरवाढ व वाढत्या महागाई संदर्भात केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar