Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
GK : मानवी शरीराविषयी थक्क करणाऱ्या गोष्टी, वाचून बसेल धक्का!

GK : मानवी शरीराविषयी थक्क करणाऱ्या गोष्टी, वाचून बसेल धक्का!

मानवी शरीर म्हणजे एक रहस्यच आहे. मानवी शरीराबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याबाबच लोकांना माहिती नाही. वरून साधे दिसणारे मानवी शरीर आतून एखाद्या हाय-टेक कारखान्यासारखे चोवीस तास काम करत असते.

आज आपण मानवी शरीराविषयी अशाच काही थक्क करणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.

मेंदू - मेंदूमध्ये माहितीचा प्रवास तब्बल 400 किलोमीटर प्रति तास या वेगाने होतो.

डोळे - मानवी डोळे एकाच वेळी सुमारे 1 कोटी रंगांमधील सूक्ष्म फरक ओळखू शकतात.

अश्रू - नवजात बाळ एक महिन्याचं झाल्यानंतरच त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागतात.

लाळ - मानवी तोंडात दररोज सरासरी 1 लिटर लाळ तयार होते. एका व्यक्तीच्या सरासरी आयुष्याचा विचार केल्यास व्यक्ती सुमारे 40, 000 लिटर लाळ तयार करते, ज्याने 500 बाथटब सहज भरतील.

त्वचा - आपल्या शरीराची त्वचा सतत नूतनीकरण करत असते. आपण दर तासाला सुमारे 20 कोटी मृत त्वचेच्या पेशी गमावतो. वर्षाला हे प्रमाण सुमारे 4 किलो इतके असते.

हृदय - एक निरोगी मानवी हृदय एका दिवसात साधारण 1 लाख वेळा धडकते. हृदय शरीरातून बाहेर काढले तरीही जोपर्यंत त्याला ऑक्सिजन मिळतंय तोपर्यंत ते धडकत राहू शकते, कारण त्याचे स्वतंत्र इलेक्ट्रिकल सिग्नलिंग नेटवर्क असते.

फुफ्फुस - मानवाचं डावे फुफ्फुस उजव्या फुफ्फुसापेक्षा 10 टक्क्यांनी लहान असतं.

रक्तवाहिन्या - आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची एकूण लांबी सुमारे 96,000किलोमीटर आहे. म्हणजेच, आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या एकामागे एक जोडल्या, तर पृथ्वीला दोनपेक्षा जास्त फेऱ्या मारता येतील.

नाभी - माणसाच्या नाभीत 67 वेगवेगळ्या प्रजातींचे बॅक्टेरिया असतात.

पोट - आपल्या पोटात अन्नाचे पचन करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होते. हे ऍसिड इतके शक्तिशाली असते की ते लोखंडाची रेझर ब्लेड देखील विरघळवू शकते. मात्र, या ऍसिडमुळे पोटाला इजा होऊ नये म्हणून पोटात एक सुरक्षित श्लेष्माचा (Mucus) थर तयार होत असतो.

मांडीचे हाड - आपल्या शरीरातील मांडीचे हाड हे सर्वात मोठे हाड आहे. हे हाड कॉक्रींटच्या स्लॅबपेक्षाही जास्त वजन सहन करू शकते.

वजन - एखाद्या व्यक्तीच्या एकूण वजनापैंकी 8 टक्के वजन हे फक्त रक्ताचं असतं.

हसणे - लाजून हसणे ही निसर्गानं सजीव प्राण्यांमध्ये फक्त मानवाला दिलेली देणगी आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar