Saturday, 19 Jun, 12.11 am My महानगर

देश-विदेश
Hike in Petrol, Diesel prices: महाराष्ट्र, राजस्थानसह 'या' ८ राज्यात पेट्रोल शंभरीपार

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने सर्वच जण चिंतेत असताना आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे आर्थिक गणितं बिघडवले आहेत. सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी इंधन दरवाढीनंतर जम्मू-काश्मीर हे दुसरे केंद्र शासित प्रदेश बनले तर बंगळूर हे तिसरे मेट्रो शहर बनले आहे. ज्या ठिकाणी पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांपार गेले आहे. शुक्रवारी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल २७ पैसे तर डिझेल २८ पैशांनी प्रतिलिटर महाग केले आहे. यासह आतापर्यंत सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पार गेल्या आहेत.

या राज्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकचा समावेश आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील लडाखनंतर शुक्रवारीपासून पेट्रोल १०० रुपये प्रती लिटरवर विकले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या सध्याच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यांच्या आधारे ऑयल मार्केटिंग कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवत असतात. दरम्यान, शुक्रवारी, सात आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत २६ वी दरवाढ सलग दुसर्‍या दिवशी करण्यात आली.

शुक्रवारी इंधन दरवाढीनंतर नवी दिल्लीत पेट्रोल ९६.९३ रुपये प्रतिलिटर विक्रमी उच्चांकावर विकले जात होते तर डिझेल ८७.६९ रुपये प्रति लिटर असे विक्री होत आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत तब्बल १००.१७ रुपये होती तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ९२.९७ रुपये अशी होती. यापूर्वी २९ मे रोजी मुंबईत आणि गेल्या आठवड्यात हैदराबादमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पार गेल्याचे सांगितले जात आहे.


C Voter Survey: कोरोनावरील मोदी सरकारच्या कामावर जनता किती समाधानी? बघा काय सागंतय सर्वेक्षण

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top