मेष - प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल, प्रकृती सुधारेल. प्रवासाचा आनंद घ्याल. वाहन जपून चालवा. आपल्या धंद्यात वाढ करता येईल. वृषभ - नोकरी-व्यवसायात सुसंधी उपलब्ध होतील. मोठे आर्थिक नियोजन सावधपणे करावे.
सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखाल.
मिथुन - नवीन परिचय फायदेशीर ठरेल. स्पर्धा जिंकाल. आपणास क्षुल्लक अडचणींना तोंड द्यावे लागेल. आप्तेष्टांमध्ये आनंदी वेळ घालवाल.
कर्क - धंद्यात कामे मिळतील. वसुलीसाठी प्रयत्न कराल, घरातील व्यक्तीचा राग घालवता येईल. वरिष्ठांची मर्जी राखा. जुने मित्र भेटतील.
सिंह - व्यवसायात महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. महत्त्वाचे काम करून घ्या.
कन्या - नोकरीतील चूक सुधाराल. सहकार्यांशी वादविवाद टाळावेत. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
तूळ - किरकोळ कारणाने मन अस्थिर होईल. सौम्य शब्दांत बोला. मोठी गुंतवणूक सावधपणे करावी. कामात अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक - व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. कार्यातील अडचणी कमी होतील. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु - नोकरीतील ताणतणाव कमी करता येईल. कोर्ट-कचेरीच्या कामात आपणास सहाय्यता मिळेल. एखादा धाडसी निर्णय घेऊ शकाल.
मकर- नोकरीत वरिष्ठांचा कल पाहूनच बोला. तुमचे मन स्थिर ठेवता येईल. नवीन ओळखीमुळे आपला उत्साह वाढेल. बोलणे सौम्य ठेवा.
कुंभ - कौटुंबिक समस्या सोडवता येतील, व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. थोडीशी धावपळ होईल. जुनी येणी वसूल करता येतील.
मीन -प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कोणत्याही भ्रमात राहू नका. तुमचे महत्त्व वाढेल. धंद्यात मोठे काम मिळेल.

