Dailyhunt
Horoscope : गुरुवार, 09 एप्रिल 2026

Horoscope : गुरुवार, 09 एप्रिल 2026

मेष - प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका. वेळेला महत्त्व द्या. महत्त्वाची कामे करा. केस जिंकाल. वृषभ - तडजोड केल्यास समस्या गंभीर स्वरूप धारण करणार नाही.

जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
मिथुन - धार्मिक कार्यात सहभागाची संधी मिळेल. कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. विरोधकांना न दुखावता काम करा.
कर्क - कर्तृत्वाला वाव मिळेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. घरातील व्यक्तीला कमी लेखू नका. नम्र राहा. आळस करू नका.
सिंह - स्पर्धा जिंकल्याने तुमचे महत्त्व वाढेल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. आपल्या कामात क्षुल्लक अडचण येईल. हुशारी वापरावी.
कन्या - पदाची मागणी करण्यापेक्षा कार्यावर भर द्या. यश मिळेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करता येईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल.
तूळ - खाण्याची चंगळ होईल. वेगळाच अनुभव घ्याल. जास्त भावनावश होऊ नका. मौल्यवान खरेदी कराल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक - जीवनाला कलाटणी मिळेल. नवे कार्य आरंभ कराल. गरज नसेल तर फार बोलू नका. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल.
धनु - क्षुल्लक कारणाने वाद होईल. आपली आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा. प्रगतीला चांगला वाव मिळेल.
मकर - नोकरीत महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वादाच्या मुद्यात अडकू नका. वरिष्ठांची मर्जी पाहूनच मत व्यक्त करा. जिद्दीने यश मिळेल.
कुंभ - प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पडेल. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. अनावश्यक खरेदी केली जाईल.
मीन - जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. उगाचच एखादी चिंता सतावेल. धंद्यात एखादा नवा पर्याय मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar