Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Horoscope : गुरुवार, 21 मे 2026

Horoscope : गुरुवार, 21 मे 2026

मेष - ठरवलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. विरोध सहन करून काम करावे लागेल. पराक्रमात वाढ होईल. मन:शांती लाभेल. वृषभ - संततीच्या प्रगतीने खूश व्हाल. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

धंद्यात लाभ होईल.
मिथुन - आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विरोधक माघार घेतील. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क - जीवनसाथीच्या मर्जीनुसार वागावे लागेल. स्पर्धा सरस होईल. शक्यतो मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. प्रसिद्धी मिळेल.
सिंह - कठीण कामात प्रयत्नाने आपणास यश मिळवता येईल. जीवनातील अडचणी कमी होतील. व्यवसायात नीतीचा मार्ग अवलंबा.
कन्या - अपेक्षित व्यक्ती भेटल्यामुळे कठीण कामातील अडचणी कमी होतील. नफा वाढेल. कायदा मोडू नये. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
तूळ - धंद्यात वाढ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. संयम बाळगून वागा. प्रवासात आनंद मिळेल. स्पर्धा आकर्षक ठरेल.
वृश्चिक - मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. मान सन्मानात वाढ होईल. विचारपूर्वक पावले उचला. अडचणीतून मार्ग निघेल.
धनु - नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. मुलांकडून शुभवार्ता मिळेल. खरेदी कराल.
मकर - कौटुंबिक तिढा सोडवाल. एखाद्या कामासाठी आपणास अधिक धावपळ करावी लागेल. आपल्या धाडसी वृत्तीचे दर्शन घडेल.
कुंभ - आपली जुनी कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
मीन - कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar