मेष - अधिक संवेदनशील व्हाल. दिवस आनंदात जाईल. उग्र चर्चा करू नका. आर्थिक मदत मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. वृषभ - आपल्या नोकरीत फायदेशीर बदल करता येतील. मान-सन्मानाचा योग येईल. रागीट आणि हट्टी स्वभावाला मुरड घाला.
मिथुन - आकस्मिक पैसे खर्च होतील. गृहस्थ जीवनात सुख आणि आनंद मिळेल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करता येईल.
कर्क - कार्यक्षेत्रात आपला प्रभाव टिकून राहील. कलाकारांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो.
सिंह - प्रतिष्ठेचा बडेजाव न करता कामे करा. शेजारी मदत करतील. सरकारी कामात यश मिळेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या - नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आर्थिक कार्यात लाभ मिळेल. पाल्यांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. नवीन परिचय होतील.
तूळ - महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. आनंददायी पर्यटन होईल.
वृश्चिक - आत्मविश्वासाने काम केल्याने यश मिळेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. सहकार्यांशी मिळते जुळते धोरण ठेवा.
धनु - संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. आळस करू नका. सोबत काम करणार्यांचे सहकार्य मिळेल. विचारांना चालना मिळेल.
मकर - कुटुंबीय तसेच मित्रांसोबत वेळ घालवाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. प्रयत्नाने कामे मार्गी लागतील.
कुंभ - तब्येत उत्तम राहील. एखादी उत्साह वाढवणारी घटना घडेल. आपल्या बोलण्यावर आणि वर्तनावर संयम ठेवावा लागेल.
मीन - नव्या कामाचा शुभारंभ करू शकता. आरोग्यावर पैसे खर्च होतील. मोहाला बळी पडू नका. इतरांशी नम्रपणे बोलावे.

