Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Horoscope : शुक्रवार, 01 मे 2026

Horoscope : शुक्रवार, 01 मे 2026

मेष - नव्या विचाराने प्रेरित व्हाल. कामात धाडस वाढेल. एकांगी विचार करू नये. भविष्याचे योग्य ते नियोजन आताच करा. अवास्तव खर्च कमी करा. वृषभ - भागीदाराबरोबर किरकोळ वाद होऊ शकतात. आपल्या जोडीदाराची प्रगती होईल.

कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी लागेल.
मिथुन - आपल्या वरिष्ठांना सांभाळून घ्यावे लागेल. धावपळ होईल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. धंद्यासाठी नवा विचार सुचेल. मित्रांचा सहवास लाभेल.
कर्क - प्रतिष्ठा टिकवता येईल. कामातून समाधान शोधाल. धंद्यात नोकरवर्गाला त्रास होऊ शकतो. लहान मुलांचे आरोग्य जपा.
सिंह - घरातील मतभेद मिटवता येतील. स्वतःबद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका. वरिष्ठांना तुमचे मत पटवून देता येईल.
कन्या - नित्यक्रम व्यवस्थित पार पाडता येईल. अधिकाराचा उपयोग करून घेता येईल. शांततेचे धोरण स्वीकारावे. चटकन रागावू नये.
तूळ - विचारपूर्वक गुुंतवणूक करा. फायदेशीर ठरेल. स्पर्धा आकर्षक झाल्याने उत्साह वाढेल. प्रवास घडेल. अविचाराने वागू नका.
वृश्चिक - धंद्यात नवा विचार उपयोगी पडेल. सामुदायिक वादात अडक ूनका. नावलौकिक मिळेल. वरिष्ठ व सहकारी तुमची मदत करतील.
धनु - आपल्या प्रयत्नांना चालना मिळेल. कामात यश मिळेल. मनातील आशा-निराशा यांचे द्वंद्व चालू राहील. योग्य संधीची वाट पाहावी.
मकर - नवीन मित्र जोडाल. कामाच्या पद्धतीचे कौतुक केले जाईल. मत व्यक्त करताना काळजी घ्या. फायदा होईल. कौटुंबिक समाधान लाभेल.
कुंभ - आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. काटकसर करण्यावर भर द्याल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मानसिक स्थैर्य जपावे.
मीन - सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. धंद्यात चांगला फायदा होईल. पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar