Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Horoscope : शुक्रवार, 22 मे 2026

Horoscope : शुक्रवार, 22 मे 2026

मेष - कोणत्याही कामात अधिरता ठेवल्यास भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. संयम ठेवा. धंद्यात वाढ होईल. वृषभ - घरात महत्त्वाची बातमी कळेल. कोर्ट केसमध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न करता येईल.

तब्येतीकडे लक्ष द्या.
मिथुन - आर्थिक व्यवहारात लाभ होईल. जुने येणे वसूल करा. प्रेमाला चालना देणारी व्यक्ती सहवासात येईल.
कर्क - मनाची द्विधा अवस्था कमी होईल. घरातील मोठी खरेदी झाल्याने आनंद वाटेल. मान-सन्मानाचा योग येईल.
सिंह - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमचे कठोर शब्द इतरांना दुख देऊ शकतात. राग आवरा.
कन्या - दृढ निश्चयाने एखादे काम करता येईल. शत्रूला चोख उत्तर देता येईल. वरिष्ठांना कामात मदत कराल.
तूळ - महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. धंद्यात लाभ होईल. मान-सन्मानाचा योग येईल. मौजमजेत वेळ जाईल. यश मिळेल.
वृश्चिक - उत्साहवर्धक घटना घडतील. दिवस आनंदात जाईल. कामात व्यस्त राहाल. वाहन-घर खरेदीचा मार्ग सुकर होईल.
धनु - प्रमाणाबाहेर काम करण्याच्या स्वभावाने थकवा जाणवेल. स्वच्छ हवेत फेरफटका मारा. कला-कीडा क्षेत्रात यश मिळेल.
मकर - जीवनाला कलाटणी मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. संततीबद्दल विचार कराल. धंद्यात नवे काम मिळेल.
कुंभ - तुमच्याबद्दल गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मित्र मदत करतील. धंद्यावर लक्ष द्या. आळस महागात पडेल.
मीन - मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. मौजमजेत वेळ जाईल. निसर्गाच्या सहवासात मन रमेल. कला-कीडा क्षेत्रात प्रगती होईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar