मेष - एखादी दिलासादायक घटना घडेल. विक्षिप्त लोकांपासून दूर राहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल. वृषभ - प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. शक्यतो वादाच्या मुद्यात अडकू नका.
वेळेचा सदुपयोग करावा. तब्येत उत्तम राहील.
मिथुन - महत्त्वाचे काम करता येईल. अनावश्यक खरेदी केली जाईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. धंदा मिळेल. मन स्थिर ठेवा.
कर्क - स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल. कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. जिद्द उपयोगी पडेल.
सिंह - तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. धंद्यात फायदा होईल. कठीण काम करून घ्या. वाद घालू नका. अधिकार्यांचा पाठिंबा मिळवाल.
कन्या - तुमचे मत व्यक्त करण्याची घाई करू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपल्या कर्तृत्वाला वाव मिळेल.
तूळ - आप्तेष्टांची भेट होईल. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेवू नका. व्यावसायिक स्तरावर एखादी सकारात्मक घटना घडेल.
वृश्चिक - जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. गरज नसेल तर फार बोलू नका. प्रतिष्ठा सांभाळता येईल.
धनु - महत्त्वाचे काम करून घ्या. वरिष्ठ तुमचे मत विचारात घेतील. मानसिक दुर्बलता टाळावी. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. धंद्यात जम बसेल.
मकर - कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करू नका. आपली आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. समोरील संधीचा लाभ घ्यावा.
कुंभ - मनासारखी घटना घडेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. धरसोड वृत्ती ठेवू नका. नवे परिचय होतील. महत्त्वाचे काम करा.
मीन - पदाधिकार मिळाल्याने उत्साहित व्हाल. जोडीदाराशी मतभेद टाळा. सामाजिक कामात रमाल. विचारपूर्वक गुंतवणूक करावी.

