Sunday, 22 Sep, 9.08 pm My महानगर

होम
IND vs SA, 3rd T20I : मालिकेत बरोबरी; तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

कर्णधार क्विंटन डी कॉकचे अर्धशतक आणि गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ९ विकेट राखून मात केली. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली होती. तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने २० षटाकांत ९ बाद १३४ धावा केल्या. भारताच्या १३५ धावांच्या आव्हानाला दक्षिण आफ्रीकेने सहज पूर्ण केले.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ विकेट गमावत १३४ धावाच करता आल्या. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात भारताने बाजी मारली होती. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याला ९ धावांवर डावखुरा वेगवान गोलंदाज ब्यूरन हेन्ड्रिक्सने माघारी पाठवले. यानंतर शिखर धवन आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. चायनामन फिरकीपटू तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात शिखर बाद झाला. त्याने २५ चेंडूत ३६ धावा केल्या. पुढच्याच षटकात कोहलीला ९ धावांवर कागिसो रबाडाने माघारी पाठवले. यानंतर रिषभ पंत (१९), हार्दिक पांड्या (१४) आणि रविंद्र जाडेजा (१९) यांच्याव्यतिरिक्त इतर भारतीय फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे भारताने २० षटकांत ९ बाद १३४ अशी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक ३, तर डावखुरा फिरकीपटू बोर्न फॉर्च्युन आणि हेन्ड्रिक्सने २-२ गडी बाद केले.

१३५ धावांचा पाठलाग करताना द.आफ्रिकेचे सलामीवीर डी कॉक आणि रेझा हॅन्ड्रिक्स यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १० षटकांत ७६ धावांची भागी केली. हॅन्ड्रिक्सला २८ धावांवर हार्दिक पांड्याने बाद केले. डी कॉकने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे या मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक होते. त्याने आणि बवूमाने द.आफ्रिकेला विजय मिळवून दिला. डी कॉक ७९ आणि बवूमा २७ धावांवर नाबाद राहिला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top