Sunday, 06 Oct, 1.59 am My महानगर

होम
IND vs SA : पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय!

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा २०३ धावांनी धुव्वा उडवला आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये शेवटच्या दिवशी विजयासाठी ३९५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रेकाचा संघ अवघ्या १९१ धावांमध्ये गुडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं. रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेचेच्या आघाडीच्या फलंदाजांना माघारी धाडल्यानंतर मोहम्मद शमीने पाहुण्यांची मधली फळी भेदली. परिणामी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या फलंदाजांनी दिलेली शर्थीची झुंज अखेर अपयशीच ठरली. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी साकारणाऱ्या रोहीत शर्माला सामनावीराचा किताब देण्यात आला.

भारताची तुफान फलंदाजी!

पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करत ५०२ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये भारताची सलामीची जोडी असलेल्या मयंक अगरवाल आणि रोहीत शर्मा यांच्या शतकी खेळींचा समावेश होता. मयांक अगरवालने २१५ तर रोहीत शर्माने १७६ धावा केल्या. दुसऱ्या दिवशा ७ गडी बाद झाल्यानंत भारताने आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. १४ धावांवर सलामीवीर मर्करम बाद झाला. एल्गर आणि क्विंटन डि कॉक यांची शतकं आणि फॅफ डु प्लेसिसची अर्धशतकी खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी सर्वबाद ४३१ धावा केल्या. आर अश्विनने जबरदस्त कामगिरी करत आफ्रिकेचे ७ गडी माघारी पाठवले.

दुसऱ्या डावातही रोहीतचं शतक!

दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या इनिंगमधला द्विशतकवीर मयंक अगरवाल अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. मात्र, त्यानंतर रोहीत शर्माने तुफान खेळी करत पुन्हा शतक साजरं केलं. त्याला चेतेश्वर पुजारा (८१), रवींद्र जाडेजा (४०) यांनी साजेशी साथ दिली. रोहीत शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली (३१) आणि अजिंक्य रहाणे (२७) यांनी भारताचा डाव ३२३ रनांपर्यंत नेऊन ठेवला. याच धावसंख्येवर भारतानं डाव घोषित केला.

भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा

दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी स्थिरावूच दिले नाही. पहिल्या इनिंगमधला शतकवीर एल्गर अवघ्या २ धावांवर तंबूत परतला. जाडेजाने एका सुंदर चेंडूवर त्याची विकेट घेतली. त्यानंतर ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज बाद होत गेले. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत दक्षिण आफ्रिकेचा डाव अवध्या १९१ धावांवर रोखला. मोहम्मद शमी आणि रवींद्र जाडेजा यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये केलेली कामगिरी भारताच्या विजयात मोलाची ठरली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top