Tuesday, 30 Jun, 11.26 pm My महानगर

क्रीडा
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सकडे कसोटी संघाचे नेतृत्व

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचं बक्षिस त्याला मिळालं आहे. इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचे कर्णधारपद स्टोकला देण्याचा निर्णय घेतला असून स्टोक्सने सातत्याने उत्कृष्ट खेळ खेळून संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात तो कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. नियमित कर्णधार जो रूट वैयक्तिक कारणास्तव तो या दौऱ्यावर नाही आहे.

इंग्लंडला प्रथमच विश्वविजेते बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्सचा ८ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी ईसीबीने बदललेल्या रुटच्या जागी त्याला संघाची ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूट दुसऱ्यांदा वडील बनणार असून दुसर्‍या मुलाच्या जन्मासाठी क्रिकेट बोर्डाकडे रजा मागितली. बोर्डाने त्याला मंजुरी दिली आहे.

इयन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील मर्यादित षटकांच्या रूपात उपकर्णधार म्हणून काम पाहणारा जोस बटलर कसोटीत ही भूमिका निभावणार आहे. बोर्डाने म्हटले आहे की जेव्हा रूट रुग्णालयातून परत येईल तेव्हा त्याला सात दिवस स्वत: ला अलग करावे लागेल. तरच तो संघात सामील होईल. दुसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी तो संघात सामील होईल. हा सामना ओल्ट टॅफर्ड येथे १३ जुलैपासून खेळला जाणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top