Wednesday, 15 Sep, 11.11 am My महानगर

होम
iPhone 13 लाईनअपमध्ये काय आहे खास? वाचा वैशिष्ट्ये

ॲपल आयफोनचा (Apple iPhone) इव्हेंट संपला आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 13 लाईनअपचे चार मॉडेल iPhone 13 Pro Max, iPhone 13 Pro, iPhone 13 Mini आणि iPhone 13 भारतात लाँच केले आहेत. iPhone 13 व्यतिरिक्त ॲपल वॉच सिरीज ७ (Apple Series 7) आणि आयपॅडसह (iPad) आयपॅड मिनी (iPad Mini) लाँच केले गेले आहेत.

iPhone 13 Mini

 • 128 GB - ६९,९०० रुपये
 • 256 GB - ७९,९०० रुपये
 • 512 GB - ९९,९०० रुपये
 • iPhone 13 Mini आणि iPhone 13 ची प्री बुकिंग १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर फोन विक्री २४ सप्टेंबरपासून होईल.

Apple iPhone 13 mini मध्ये ५.४ इंचाची स्क्रीन दिली आहे. फोन एका छोट्या नॉच डिस्प्लेसोबत येईल, जो Super Retina XDR डिस्प्ले असेल. फोन Apple A15 Bionic चिपसेट सपोर्टसोबत येईल. iPhone 13 mini मध्ये 12MP ड्यूल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. शिवाय फ्रंटमध्ये 12MP कॅमेरा मिळेल. तसेच सेंसर शिफ्ट टेक्नोलॉजीसोबत येईल, जो iPhone 12 Pro Maxच्या अल्ट्रा वाईड सेंसरमध्ये दिली गेली होती. हा फोन IR-पॉवर्ड Face ID फेशिअल रिकग्निशनसोबत येईल. यामध्ये मोठी बॅटरी दिली गेली आहे, जी लाईटनिंग केबसद्वारे चार्ज केले जाऊ शकते. फोन Midnight, Blue, Pink, Starlight आणि Product Red कलर व्हेरियंटमध्ये येईल.

iPhone 13

 • 128 GB - ७९,९०० रुपये
 • 256 GB - ८९,९०० रुपये
 • 512 GB - १,०९,९०० रुपये

iPhone 13 स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा देखील फोन छोट्या नॉच डिस्प्लेसोबत येईल. शिवाय यामध्ये 60Hz रिफ्रेस्ड रेट दिला गेला आहे. iPhone13 स्मार्टफोन A15 Bionic चिपसेटद्वारे पॉवर्ड आहे. iPhone13 मध्ये 12MP ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंटमध्ये 12MP कॅमेरा मिळेल. तसेच कॅमेऱ्यामध्ये सेंसर शिफ्ट टेक्नोलॉजीचा वापर केला गेला आहे. फोन IR-बेस्ड Face ID आणि मोठ्या बॅटरीसोबत येईल. या फोनमध्ये IP68 वॉटर रेजिस्टेंस दिला गेला आहे. हा फोन Midnight, Blue, Pink, Starlight आणि Product Red व्हेरियंटमध्ये येईल.

iPhone 13 Pro

 • 128GB - १,१९,९०० रुपये
 • 256GB - १,२९,९०० रुपये
 • 512GB - १,४९,९०० रुपये
 • 1TB - १,६९,९०० रुपये
 • हा फोन चार कलर ऑप्शन Sierra Blue, Silver, Gold आणि Graphite मध्ये येईल. iPhone 13 Pro आणि प्रो मॅक्सची प्री बुकिंग १७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर विक्री २४ सप्टेंबरपासून सुरू होईल.

iPhone 13 Proमध्ये ६.१ इंचाचा LTPO Apple ProMotion 120Hz सुपर रेटिना XDR पॅनल दिला गेला आहे. हे डायनॉमिकली 10Hz आणि 120Hz रिफ्रेस्ड रेटमध्ये सेट करू शकतील. iPhone 13 Pro स्मार्टफोनमध्ये नवा Apple A15 Bionic चिपसेट पॉवर्ड दिला गेला आहे. यामध्ये कॅमेरा मोड नाईट मोड, Smart HDR 4 आणि Deep Fusion, Apple ProRAW सोबत पोर्टे्रट मोड आणि पोर्टेट लाईटिंग मोड दिला गेला आहे. हा फोन सिनेमॅटिक मोडसोबत येईल.

iPhone 13 Pro Max

 • 256GB - १,३९,९०० रुपये
 • 512GB - १,५९,९०० रुपये
 • 1TB - १,७९,९०० रुपये

iPhone 13 लाईनअपचा सर्वात पावरफूल फोन iPhone 13 Pro Max स्मार्टफोन आहे. यामध्ये ६.७ इंचाचा Super Retina XDR स्क्रीन, ProMotion 120Hz LTPO पॅनल, डायनमिक चेंज आणि रिफ्रेस्ड रेटचा सपोर्ट दिला गेला आहे, जो 10Hz ते 120Hz दरम्यान सपोर्ट करण्यास सक्षम असेल. हा फोन नवा Apple A15 Bionic चिपसेट सपोर्टसोबत येईल. iPhone 13 Pro Max मध्ये नाईट मोड, Smart HDR 4,Deep Fusion, Apple ProRAW आणि पोर्ट्रेट, पोर्ट्रेट लाइटनिंग मोड दिला गेला आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top