Wednesday, 15 Sep, 6.40 pm My महानगर

क्रीडा
IPL 2021 2nd Phase: UAE स्टेडियममध्ये मिळणार प्रेक्षकांना एण्ट्री, IPLचा मोठा निर्णय

IPL च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल चाहत्यांचे पुन्हा एकदा स्वागत करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग सज्ज झाली आहे. आयपीएलचे प्रेक्षक संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या स्टेडियमवर पुन्हा एकदा दाखल होणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे माहिती देत, म्हटले आहे की, "आम्ही VIVO IPL 2021 स्टेडियमवर चाहत्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत."(VIVO IPL 2021 set to welcome fans back to the stadiums)

19 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात फेज -२ चा दुसरा सामना पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये येऊ शकतील असे ट्विट मध्ये सांगण्यात आले आहे.आयपीएल 2021 चा पहिला फेज खाली स्टेडियममध्ये खेळला गेला होता. तसेच कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर 2020 मध्ये देखील आयपीएल संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळली गेली आणि नंतर ती रिकाम्या म्हणजेच प्रक्षक विरहीत स्टेडियममध्ये खेळली गेली.
आयपीएल 2021 चा पहिला टप्पा भारतात खेळला गेला आणि त्यानंतरही सामने रिकाम्या स्टेडियममध्ये झाले. 2019 च्या आयपीएलनंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा चाहते स्टेडियमला ​​भेट देऊन सामन्याचा आनंद घेऊ शकतील. तिकीट बुकिंग संबंधी सर्व तपशील आयपीएल साईटवर शेअर करण्यात आले आहेत. आयपीएलनुसार, चाहते 16 सप्टेंबरपासून तिकीट बुक करू शकतात.


हे हि वाचा - India vs Pakistan T20 World Cup 2021: भारत पाकमध्ये तूर्तास मालिका अशक्य - रमीझ राजा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top