Thursday, 22 Apr, 10.19 am My महानगर

क्रीडा
IPL 2021 : हैदराबादने अखेर विजयाचे खाते उघडले!

सलग तीन पराभवांनंतर अखेर सनरायजर्स हैदराबादला यंदाच्या आयपीएल मोसमात आपले विजयाचे खाते उघडण्यात यश आले. आज दुपारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्स संघावर ९ विकेट राखून मात केली. या सामन्यात पंजाबचा डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला आणि हैदराबादने हे लक्ष्य ९ विकेट आणि ८ चेंडू राखून गाठले. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने हैदराबादकडून अप्रतिम फलंदाजी करताना ५६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार डेविड वॉर्नर (३७) आणि केन विल्यमसन (नाबाद १६) यांची उत्तम साथ लाभली.

खलील अहमदच्या तीन विकेट

त्याआधी या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पंजाबने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. राहुल केवळ ४ धावा करून बाद झाला. मयांक अगरवाल (२२) आणि क्रिस (१५) यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर शाहरुख खान (२२) वगळता पंजाबच्या इतर फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे त्यांचा डाव १२० धावांवर आटोपला. हैदराबादकडून खलील अहमदने तीन, तर अभिषेक शर्माने दोन विकेट घेतल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top