Friday, 23 Apr, 3.35 am My महानगर

क्रीडा
IPL 2021 : 'जलवा है हमारा यहाँ'! पंजाब किंग्सच्या निकोलस पूरनला चाहत्यांनी केले ट्रोल

सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा पराभव करत यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय मिळवला. या सामन्यात पंजाबच्या सर्वच फलंदाजांनी निराशा केली. मात्र, असे असतानाही चाहत्यांनी पंजाबच्या एका फलंदाजाला सोशल मीडियावर विशेष ट्रोल केले. तो फलंदाज म्हणजे निकोलस पूरन. वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज असणाऱ्या पूरनला यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याला पहिल्या चार पैकी तीन सामन्यांत खातेही उघडता आले नाही. त्यामुळे त्याने आयपीएलमध्ये नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. तो राजस्थान रॉयल्सविरुद्ध एका चेंडूत शून्य धाव, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दोन चेंडूत शून्य धाव करून बाद झाला. तर हैदराबादविरुद्ध त्याने एकही चेंडू खेळला नाही आणि तो खाते न उघडता धावचीत झाला. त्याच्या या अपयशानंतर चाहत्यांनी त्याला बरेच ट्रोल केले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top