Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL Orange Cap 2026 : शुभमन गिल आणि साई सुदर्शनने संधी गमावली; 'ऑरेंज कॅप' वैभव सूर्यवंशीच्या नावावर

IPL Orange Cap 2026 : शुभमन गिल आणि साई सुदर्शनने संधी गमावली; 'ऑरेंज कॅप' वैभव सूर्यवंशीच्या नावावर

वी दिल्ली : गुजरात टायटन्सविरुद्ध (gujarat titans) झालेल्या क्वालीफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने 47 चेंडूंमध्ये 8 टौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 96 धावांची शानदार खेळी केली होती.

या खेळीसह वैभवने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली होती. मात्र क्वालीफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव करत गुजरात टायटन्स संघ अंतिम फेरीत पोहचला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी गुजरात टायटन्सचे फलंदाजी कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांना होती. मात्र अंतिम सामन्यात शुभमन गिल आणि साई सुदर्शन झटपट बाद झाल्यामुळे ऑरेंज कॅप आता वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाली आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये खेळलेल्या 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.31 च्या स्ट्राईक रेटने 776 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिल 16 डावांमध्ये 45.75 च्या सरासरीने आणि 163.03 च्या स्ट्राईक रेटने 732 धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर साई सुदर्शन 17 डावांमध्ये 45.12 च्या सरासरीने आणि 157.99 च्या स्ट्राईक रेटने 722 धावा करून तिसऱ्या क्रमाकावर आहे. विशेष म्हणजे आयपीएल 2026 मध्ये सहा फलंदाजांनी 600 हून अधिक धावा केल्या आहेत. यात सनरायझर्स हैदराबादचे हेनरिक क्लासेन आणि ईशान किशन, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यांचा समावेश आहे. मात्र वैभव सूर्यवंशी, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना 700 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले.

गिल आणि साई स्वत:त बाद झाले

दरम्यान, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2026 चा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या गुजरात टायटन्स संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 26 धावांवर संघाच्या दोन विकेट पडल्या. कर्णधार शुभमन गिल 10 धावा करून बाद झाला, तर साई सुदर्शनला 12 धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमाकावर आलेला निशांत सिंधू सुद्धा फक्त 20 धावा करून बाद झाला. त्यामुळे आता गुजरात टायटन्स संघ निर्धारीत 20 षटकानंतर आरसीबीला किती धावांचे लक्ष्य देते? हे पाहावे लागेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar