Wednesday, 15 Sep, 5.35 pm My महानगर

ताज्या बातम्या
जनता भोळी मात्र मूर्ख नाही; OBC आरक्षणावरुन चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कळून चुकले आहे. 'जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही हे महाविकास आघाडी सरकारने लक्षात ठेवावे असा सूचक इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. नाना पटोले ओबीसी आरक्षणावरुन केंद्राकडे बोट दाखवून ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजाने सरकारला दणका द्यायला पाहिजे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे की, ठाकरे सरकारमधील नाना पटोले हे आज इम्पेरिकल डेटासंदर्भात मोदी सरकारकडे बोट दाखवत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मधल्या काळात पटोले यांनीच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात वकील देत नाही असा आरोप केला होता, याचा बहुदा त्यांना विसर पडला असावा असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपा महाराष्ट्र वेळोवेळी ओबीसी समाजाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. भाजपाने ओबीसींसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आणि आजही संघर्ष करत आहे. परंतु आपलं खोटं बाहेर पडेल या भीतीने भाजपाचे आजचे ओबीसी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे. शेवटी सत्य कितीही झाकले तरी ते बाहेर पडणारच! महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कळून चुकले आहे. 'जनता भोळी जरूर आहे, पण मूर्ख नाही' हे मविआ सरकारने योग्यरीत्या लक्षात ठेवावे असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

ओबीसी समाज बांधवांसोबत विश्वासघात करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मविआ सरकारविरुद्ध भाजपाने राज्यभरात प्रखर आंदोलन सुरू केले आहे. आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. ओबीसी समाजानेच आता या सरकारला दणका द्यायला हवा. आपल्याला आता भाषण बंद आणि संघर्ष सुरू करावा लागणार आहे. फडणवीस सरकारने दिलेले २७% आरक्षण या मविआ सरकारने समाप्त केलं. वारंवार या सरकारने ओबीसी बांधवांवर अन्याय केला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यभर आमचा संघर्ष सुरुच राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.


: फडणवीस स्वतःच OBC आरक्षणाचे मारेकरी; आंदोलनाने पाप झाकता येणार नाही - नाना पटोले


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top