Wednesday, 25 Sep, 6.40 am My महानगर

क्रीडा
कसोटी संघात पुनरागमनास उत्सुक!

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये साधारण कामगिरी असतानाही मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध फिंचला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

युएई येथे झालेले या मालिकेचे २ आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेले भारताविरुद्ध ३ असे फिंचने एकूण ५ कसोटी सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याला २७.८० सरासरीने केवळ २७८ धावाच करता आल्या. त्यामुळे त्याने संघातील स्थान गमावले. मात्र, आता तो कसोटी संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

मला पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. मला ऑस्ट्रेलियन कसोटी संघात पुनरागमन करायचे आहे. माझ्या जागी ज्या युवा खेळाडूंना संधी मिळाली, त्यांनी संधीचा चांगला उपयोग केला. कुर्टीस पॅटर्सन आणि ट्रेव्हिस हेड यांसारखे युवा खेळाडू उत्तम खेळले आहेत. कुर्टीसने त्याच्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावले आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये अजून काही असे फलंदाज आहेत, जे ऑस्ट्रेलियन कसोटी संघात स्थान मिळवू शकतील. मात्र, मी प्रयत्न करत राहणार आहे. मी स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली, तर कसोटी संघात पुनरागमन करू शकेन, असे फिंच म्हणाला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top