Friday, 24 Sep, 12.10 pm My महानगर

देश-विदेश
कोरोनावरील Ivermectin आणि Hydroxychloroquine औषधांचा वापर थांबवला, ICMR च्या नव्या गाइडलाईन्स

कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमधून आता Ivermectin आणि Hydroxychloroquine ही दोन औषधे काढून टाकण्याचा निर्णय आयसीएमआरने घेतला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित प्रौढ रुग्णांवर यापुढे या दोन्ही औषधांचा वापर होणार नाही. असेही आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

आयसीएमआरच्या COVID-19 नॅशनल टास्क फोर्सने यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केली आहे. यात आयसीएमआरने म्हटले आहे की, कोरोनाबाधिक प्रौढ रुग्णांवरील उपचारांसाठी वापरले जाणारे Ivermectin आणि Hydroxychloroquine (HCQ) औषध कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांमधून' (clinical guidance for management of adult COVID-19 patients) काढून टाकले आहे.

यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) ने कोरोनावरील उपचारांसाठी वापरले जाणारे Ivermectin आणि Hydroxychloroquine औषधांचा वापर बंद करावा यासाठी व्यापक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या, मात्र या निर्णयामुळे आसीएमआर आणि डीजीएचएसमध्ये मतभेद दिसून आले. कारण आयसीएमआरने यावर कोणतेही आदेश दिले नव्हते. मात्र आता आयसीएमआरकडूनही या दोन्ही औषधांच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जाहीर झालेत. त्यामुळे कोरोनावर वापरले जाणारे रेमडेसिवीर औषधाप्रमाणेच Ivermectin आणि Hydroxychloroquine औषधांचाही वापर करता येणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने देखील Ivermectin आणि Hydroxychloroquine या औषधांच्या वापरासंदर्भात सावधगिरी बाळगण्याच्या सुचना दिल्या होत्या. भारतीय बाजारपेठेतील अनके औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या Ivermectin औषधाची निर्मिती करतात. कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे २०२० पासून डॉक्टरांकडून उपचारांसाठी हे औषध लिहून दिली जात होती. त्यामुळे त्यांच्या विक्रीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती.

अमेरिका व इतर देशांमध्ये मलेरियाच्या आजारासाठी वापरले जाणारे मात्र आता कोरोनासाठी वापरत असलेले हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाचा वापर थांबवला आहे. या औषधामुळे रुग्णांच्या हृदयावर परिणाम होत असल्याने आरोग्य संस्थांचे मत आहे.


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top