Tuesday, 19 Jan, 2.50 am My महानगर

मनोरंजन
लैंगिक छळामुळे जिया सोडणार होती चित्रपट, बहिणीचा गौप्यस्फोट

हिंदी चित्रपटसृष्टीत लैंगिक आणि मानसिक छळाविरोधात अनेक अभिनेत्र्या अवाज उठवत आहेत. यामुळे बॉलिवडूमधील घृणास्पद गोष्टींचा खुलासा होत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्यावर लैगिक अत्याचार केला असल्याचे आरोप काही अभिनेत्र्यांनी केला आहे. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक साजिद खान हे एक चर्चेत राहिलेले नाव आहे. काहिवर्षांपूर्वी २०१८ साली दिग्दर्शक साजिद खान याच्यावर अनेक मॉडेल आणि अभिनेत्र्यांनी लैगिक शोषण आणि अत्याचार केला असल्याचे आरोप केले होते. यानंतर पुन्हा एकदा साजिद खानवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळीस अभिनेत्री जिया खानची बहिण करिश्माने साजिदवर लैगिक अत्याचार केला असल्याचे सांगितले आहे. जियाला टॉप आणि ब्रा काढायला सांगितल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे.

अभिनेत्री जिया खानची बहिण करिश्मा खानने मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. रिहर्सल सुरु होते. त्यादरम्यान जिया आपली स्क्रिप्ट वाचत होती. दिग्दर्शक साजिद खान तिच्याजवळ येत टॉप आणि ब्रा काढायला सांगितले. जियाला काय करावे हे सुचत नव्हते. चित्रपटाचे शुटींगही सुरु झाले नव्हते आणि असा प्रकार घडल्यावर जिया घरी येऊन रडू लागली. तिने घडलेला सारा प्रकार आपल्याला सांगितला होता. असे जियाची बहिण करिश्माने म्हटले आहे.

करिश्माने पुढे म्हटले आहे की, ही घटना हाऊसफुल्ल सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानची आहे. डेथ इन बॉलीवुडने यासंदर्भात एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओत जिया खानची बहिण करिश्माने सांगितले की, मी या चित्रपटासाठी करार केला आहे. जर मी हा चित्रपट सोडला तर मला धमकी देण्यात येईल तसेच माझे नावही बदनाम करण्यात येईल तसेच मी जर या चित्रपटात काम करत राहिली तर माझा छळ करण्यात येईल. सर्व बाजूंनी जियाची कोंडी झाली होती त्यामुळे या चित्रपटात तिने काम केले असल्याचे करिश्माने म्हटले आहे.

करिश्माने सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. मला आठवत आहे. जेव्हा मी माझी मोठी बहीण जिया खानसोबत साजिद खानच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी १६ वर्षांची होती. मी फक्त स्ट्रॅपी टॉप परिधान केला होता. दिग्दर्शक साजिद खान माझ्याकडे एकटक पाहत म्हणाला हिला सेक्स पाहिजे आहे का? यावर जिया खानचे आणि साजिदमध्ये वाद झाला आणि आम्ही तिथून निघालो असल्याचे करिश्माने सांगितले आहे.

जिया खानने २०१३ साली आत्महत्या केली. जिया खानने आपल्या छोट्या कारकिर्दीत प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. याशिवाय तिने अमिताभ बच्चनसोबत निशब्द, आमिर खानसोबत गजनी तर अक्षय कुमारसोबत हाऊसफुल्ल या चित्रपटांत काम केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top