Wednesday, 15 Sep, 3.43 pm My महानगर

ताज्या बातम्या
लवकरच पितळ उघडं पाडणार, जमीन पुन्हा मिळवताच पडळकरांचा काका-पुतण्यांना इशारा

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली असल्याचे पडळकर यांनी सांगितले आहे. यामुळे आता प्रस्थापितांचे पितळ जगासमोर उघडे पडणार असल्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे. गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. ओबीसी आरक्षण, एमपीएससी परीक्षांवरुन पडळकरांनी राज्यसरकारविरोधात टीकास्त्र डागलं होते. तसेच जमीन पुन्हा मिळाल्यामुळे पडळकरांनी कोर्टाचे आभार मानले आहेत.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा इशारा दिला आहे. पडळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत,कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी 'काका-पुतण्याच्या' टोळीने 'मुळशी पॅटर्नद्वारे' कब्जा मारलेली ११३ एकर जमिन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. असे सूचक ट्विट पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या ट्विटमुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. नक्की पडळकर कोणाचे पितळ उघडं पाडणार असा प्रश्न सर्वांसमोरच उपस्थित झाला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये रोख कुणाकडे आहे याबाबत स्पष्टोक्ती मिळाली नाही. परंतु काका-पुतण्या म्हणत पडळकर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करत असतात. ट्विटमध्ये पडळकरांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे नाव घेतल नाही परंतु इशारा पवारांना असल्याचे दिसत आहे.

ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांची टीका

ओबीसींना जोपर्यंत योग्य प्रतिनिधीत्व मिळत नाही,तोपर्यंत सरळसेवा भरतीवर स्थगिती होती, पण आता ती स्थगिती उठवत बिंदू नामावलीतही दिवसाढवळ्या ओबीसींना डावललं जातंय. ओबीसींच्या संवैधानिक अधिकारांना पायदळी तुडवणाऱ्या 'प्रस्थापितांच्या' सरकारचा धिक्कार असो. आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका.लवकरात लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.


: terrorist arrest : मुंबईत दहशतवाद्यांना पकडणं धोक्याची घंटा, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top