Friday, 11 Jun, 7.35 am My महानगर

ताज्या बातम्या
Live Update: मुलुंड आणि ठाणे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने स्लो ट्रॅकवरील ट्रेन बंद

मुलुंड आणि ठाणे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने स्लो ट्रॅकवरील ट्रेन बंद करण्यात आले आहे, अशी माहिती एका ट्विटर युझरने आपल्या अकाउंटवरून दिली आहे.


पुण्यातील सर्व दुकानं, मॉल्स, अभ्यासिका, वाचनालय सोमवारपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानं, मॉल्स ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.


शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची बैठक सुरू झाली आहे. गेल्या २० मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.


बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील पीडी हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


मुंबईतील माहिममध्ये भागात पाणी साचलं.


मुंबईत काल, गुरुवारी सकाळपासून थोड्या प्रमाणात पाऊस पडला. पण त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसह मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे मुंबईच्या सखल भागात पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अंधेरी सब-वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या वाशीतही जोरदार सरी बरसत आहे.


आयएमडीने शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

सायनमधील व्हिज्युअल


जगभरातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू स्थिरावत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार,जगातील कोरोनाबाधितांची संख्या १७ कोटी ५६ लाख ३ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ८८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ९१ लाख ३८ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात गुरूवारी कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्यात गुरुवारी १२ हजारांहून अधिक नव्या रूग्णांचे निदान झाले तर ३९३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वाचा


मुंबईत गुरुवारी ६६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हीच संख्या ७८८ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख १४ हजार ४५० इतकी झाली आहे. सविस्तर वाचा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top