उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेस्को सेंटरमध्ये पोहोचले
मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये वर्धापन दिनादिवशी काय बोलणार एकनाथ शिंदे?
याकडे सर्वांचे लक्ष
19/6/2026 19:57:3
षण्मुखानंदमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पोहोचले
षण्मुखानंदमध्ये शिवसेनेचा वर्धापनदिन सोहळा सुरु
रश्मी ठाकरेही सोहळ्यासाठी उपस्थित
19/6/2026 18:48:32
भिवंडीत इलेक्ट्रिक सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग
अंजूर फाटा चिंचोटी रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला लागली आग
अंजूर फाटा चिंचोटी रस्त्यावरून इलेक्ट्रिक बॅटऱ्या आणि इलेक्ट्रिक वस्तूंनी भरलेला ट्रक चिंचोटीच्या दिशेने जात असताना ट्रक पायगाव हद्दीत असताना लागली आग
19/6/2026 17:25:48
अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार
न्युयॉर्क टाईम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात
न्युयॉर्क नेक्स्ट बास्केटबॉल संघाच्या जेतेपदाच्या विजयाच्या जल्लोष करताना गोळीबार झाल्याने गोंधळ
गोळीबार करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट
19/6/2026 16:30:37
बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी बोलावली बैठक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची महत्त्वाची बैठक
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकीत चर्चा
19/6/2026 16:23:12
नेस्को सेंटरमध्ये काळ्या कपड्यांवर बंदी
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगाव नेस्कोमध्ये वर्धापन दिन सोहळा
शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन
काळे कपडे घातलेल्यांना पोलिसांनी अडवले
काळे कपडे घालून येणाऱ्यांची अडवणूक
19/6/2026 15:21:48
भाजप नेते प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीला
प्रसाद लाड पोहोचले अंतरवाली सराटीत
19/6/2026 12:41:50
अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांच्या भेटीला गिरीश महाजन
5 दिवसांपासून रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन
तुपकरांचे सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन
19/6/2026 12:37:57
वरूण सरदेसाईंच्या जनता दरबाराला आशिष शेलार उपस्थित
एसआरए संदर्भात वरूण सरदेसाईंचा दरबार
19/6/2026 11:56:29
सोलापुरात फुटीर खासदारांविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन
गणपती घाटावर फुटीर खासदारांच्या प्रतिकात्मक दशक्रिया विधी
19/6/2026 11:34:50
कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन रविवारी 4 तासांसाठी बंद
रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंबाबाईच्या दर्शनाला येणार असल्याकारणाने मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी बंद राहणार
19/6/2026 9:43:57
आज दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन
ठाकरेंच्या शिवसेनेचा षण्मुखानंद हॉल येथे मेळावा
शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये मेळावा
19/6/2026 9:12:49
ठाकरेंच्या सेनेतील खासदार राजाभाऊ वाजेंचे नाशकात जंगी स्वागत
खासदार वाजेंनी गद्दारी न करता ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने नाशिककरांकडून वाजेंचे जंगी स्वागत
दिल्लीहून ट्रेनने नाशकात पोहोचलेल्या राजाभाऊ वाजेंवर नाशिककरांकडून फुलांची उधळण
ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे योग्यच - खासदार वाजे
19/6/2026 8:55:45
आजपासून बेस्ट कर्मचारी संपावर
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून 100 टक्के बंदची हाक
बस आगारात प्रवाशांनी भरलेल्या बस खाली केल्या
घाटकोपरमध्ये देवनारला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस खाली करण्यात आली
बेस्टच्या संपामुळे प्रवाशांचा खोळंबा
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बससेवा, वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता
मध्यरात्रीपासून बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संपावर
19/6/2026 8:55:45

