Tuesday, 04 May, 4.11 pm My महानगर

देश-विदेश
Lockdown in India: देशात पुन्हा होणार लॉकडाऊन? टास्क फोर्सकडून केंद्राला शिफारस

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारच्या टास्क फोर्सकडून देशात कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता देशात लॉकडाऊन करण्यावर विचार करावा, असा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सल्ला दिला होता. अशा परिस्थितीत आता आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनंही कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस केली, असल्याचे सांगितले जात आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येसह कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात कडक लॉकडाऊनची गरज असल्याचे मत केंद्र सरकारच्या टास्क फोर्सनं व्यक्त केलं आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, व्ही. के. पॉल हे याबाबतचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार आहेत. टास्क फोर्समधील काही सदस्यांनी गेल्यावर्षीप्रमाणे देशभरात कडक लॉकडाऊनची शिफारस केली आहे. तर काहींनी लॉकडाऊन न करता केवळ निर्बंध कडक करा, असे म्हटले आहे. यासह कडक लॉकडाऊन करण्यासाठी टास्क फोर्सच्याच काही अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक घडी बिघडते, त्यामुळे तीन झोनचा पर्याय सुचवला आहे.

तीन झोनमध्ये वर्गवारी करण्याच्या फोर्सच्या सूचना

लो रिस्क झोन, मिडियम रिस्क झोन आणि हॉटस्पॉट अशा तीन झोनमध्ये वर्गवारी करण्याच्या टास्क फोर्सच्या सूचना असून कोरोना बाधितांच्या आकडेवारीरून हा झोन ठरवण्यात येणार आहे. लो रिस्क झोनमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण २ टक्के असेल तर शाळा-कॉलेज सुरु राहतील. दुकाने, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, कारखाने ५० टक्के उपस्थितीत सुरु ठेवण्यात यावी. मात्र, ५० पेक्षा जास्त लोक एकत्र येतील अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही. मिडियम रिस्क झोनमध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण २ ते ५ टक्के असेल तर केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी आणि हॉटस्पॉट झोनमध्ये नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ५ टक्क्याहून जास्त असेल, तर अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, हॉटेल्स, कारखाने, कार्यालयं, धार्मिक स्थळं बंद करावीत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top