Friday, 24 Sep, 12.10 pm My महानगर

देश-विदेश
LPG cylinder- घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी मोजावे १००० रुपये; सबसिडी होणार बंद ?

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक अधिकचं त्रस्त आहे. त्यातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये सातत्याने दरवाढ सुरु आहे. याचा फटकाही सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. या वाढत्या महागाईत सर्वसामान्य माणसाला आणखी एक फटका बसणार आहे. कारण घरगुती गॅस सिंलेंडरसाठी आता तब्बल १ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकार एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत आदेश आला नाही, मात्र सरकारच्या आंतरिक मूल्यांकनात अहवालात ग्राहक एका सिलेंडरसाठी एक हजार रुपये मोजू शकतो इतका सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरवरील सबसिडीसंदर्भात केंद्र सरकार दोन पर्यायांवर विचार करत आहे. यात पहिला म्हणेज ही सबसिडी सुरु ठेवायची आणि दुसरा म्हणजे उज्ज्वला योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या असक्षम वर्गालाच सबसिडी द्यायची. मात्र सबसिडी देण्यासंदर्भात अजूनही काही स्पष्ट करण्यात आले नाही.

अनेक राज्यांमध्ये सबसिडी कपात

२०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात केंद्राने ३, ५५९ कोटी रुपये सबसिडीच्या रुपात दिले. तर २०१९ ते २० मध्ये हा खर्च २४,४६८ कोटी इतका झाला होता. म्हणजे एका वर्षात केंद्राने सबसिडीत सहा पटीने कपात केली. आत्ताच्या नियमानुसार, वर्षाला १० लाखाच्यावर उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना सिलेंडरवरील सबसिडी मिळत नाही. तर मे २०२० पासून अनेक ठिकाणी एलपीजीवरील सबसिडी बंद करण्यात आली.

सिलेंडरच्या दरात सर्वाधिक वाढ

गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. २०१४ मध्ये १४.२ किलोचा सिलेंडर ४१०.५ रुपये किंमतीला मिळत होता. मात्र आता त्याच सिलेंडरसाठी तब्बल ८८४.५० रुपय़े मोजावे लागत आहेत.

यंदा सिलेंडरच्या दरात १९० रुपयांनी वाढ

जानेवारी २०२१ मध्ये एलपीडी सिलेंडरची किंमत ६९४ रुपय़े होती. आता सिलेंडरची ८८४.५० रुपये झाली आहे. त्यामुळे जानेवारीपासून ते आत्तापर्यंत घरगुती गॅस सिलेंडर जवळपास १९०.५० रुपयांनी महागला आहे.


लँड रोव्हर. स्टिअरिंग. आणि राज ठाकरे


Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar
Top