Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Din : जागतिक स्तरावर गाजणारे महाराष्ट्राच्या मातीतील पारंपारिक खेळ

Maharashtra Din : जागतिक स्तरावर गाजणारे महाराष्ट्राच्या मातीतील पारंपारिक खेळ

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा… सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा एकच आवाज म्हणजे 'महाराष्ट्र'! 1 मे रोजी संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करतं.

आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अत्यंत समृद्ध आहे. येथील पदार्थ, संस्कृती, खेळ, व्यायाम, निसर्ग सर्वच अचंबित करणारे आहे. येथील पारंपरिक खेळ आणि व्यायाम प्रकार शारीरिक बळकटी, चपळता आणि मानसिक एकाग्रता वाढवण्यावर भर देणारे आहेत. प्राचीन काळापासून महाराष्ट्रात शरीर सुदृढ राखण्यासाठी आणि मनोरंजनासाठी अनेक मैदानी व बैठके खेळ खेळले जातात. आजच्या लेखात महाराष्ट्रदिनानिमित्त महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ आणि व्यायाम शरीरासाठी कसे फायदेशीर ठरतात, हे जाणून घेऊयात.

कुस्ती - महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय पारंपरिक खेळ. आजही गावोगावी 'आखाडे' किंवा 'तालीम' रंगते. कुस्तीमुळे शरीराच्या स्नायूचा व्यायाम होतो, ज्यामुळे प्रचंड ताकद आणि सहनशक्ती निर्माण होते.

मल्लखांब - लाकडी खांबावर शरीराचा तोल सांभाळत विविध कसरती करणे म्हणजे मलखांब. हा खेळ स्नायूंना प्रचंड ताकद देतो.

दंड-बैठका - ताकदीसाठी तालमींमध्ये शेकडो दंड आणि बैठका काढल्या जातात, ज्याची ओळख देशी व्यायाम अशी आहे.

आट्यापाट्या - हा मैदानी खेळ ताकद आणि युक्तीचा कस पाहणारा आहे.

विटी-दांडू - ग्रामीण भागात लोकप्रिय असलेला हा खेळ एकाग्रता आणि अचूकता वाढवतो. मात्र हा खेळ खेळण्याचे प्रमाण आता कमी झालं आहे.

सुरपारंब्या - झाडावर चढून खेळला जाणारा हा धाडसी खेळ आहे.

मंगळागौर खेळ - श्रावण महिन्यात महिला एकत्रित येऊन हे खेळ खेळतात, जे शरीर व मनाला व्यायाम देतात.

सागरगोटे - हाताची बोटे व एकाग्रता वाढवणारा खेळ.

भातुकली - संसाराची मांडणी शिकवणारा खेळ.

लगोरी - एकावर एक रचलेले सात दगड चेंडून पाडणे आणि समोरच्या संघाने चेंडू मारण्यापूवी ते पुन्हा रचणे असा हा रंजक खेळ आहे.

बुद्धीबळ- बुद्धीची कस मांडणारा खेळ.

खो-खो - हा पायांचा व्यायाम करणारा खेळ आहे, ज्याचा विकास प्रामुख्याने महाराष्ट्रातच झाला.

कबड्डी - पूर्वी 'हुतुतू' नावाने ओळखला जाणारा हा खेळ ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय आहे. ताकद आणि श्वास रोखून धरण्याची कला यात महत्त्वाची असते.

आजच्या 'जिम' संस्कृतीच्या काळात हे पारंपरिक खेळ आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतात. हे खेळ केवळ शरीर सुदृढ करत नाहीत, तर ते आपली मराठी अस्मिता जपण्याचे काम करतात.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Mahanagar